करजगी येथील तलावात महिलेचा संशास्पद मृत्तदेह आढळला

0

उमदी,वार्ताहर:करजगी (ता-जत) येथील धानेश्वरी सुरेश अक्कलकोट (वय 20) या महिलेचा मृत्तदेह तलावात तरगंताना आढळूंन आला. शुक्रवार पासून ही महिला बेपत्ता होती. दरम्यान धानेश्वरी यांचा बूडन मृत्यु झाल्याची फिर्याद पती सुरेश निलाप्पा अक्कलकोट यांनी उमदी पोलिसात दिली आहे.मात्र घटनास्थळी सशंय व्यक्त केला जात होता.

Rate Card

    याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहीती अशी की, मयत धानेश्वरी ही दिनांक 2 मार्च रोजी घरातील कोणाला न सांगता निघुन गेली होती,रविवारी तिचा मृतदेह शेजारील तलावात तरगंताना दिसून आला.या घटनेबाबत नागरिकातून अनेक तर्कवितर्क सुरु होते. घटनेची माहीती मिळताच उमदी पोलिस घटनास्थळी जावून मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले.अधिक तपास उमदी पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.