6 वर्षापासून फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या डांळिब चोरीतील रेकार्डवरील आरोपी इरताप्पा बेंळोडगीस अटक

0

उमदी,वार्ताहर:मडसनाळ फाटा (ता.जत) येथील सहा वर्षापूर्वी एका टेंम्पोमधील डाळीब चोरीतील  आरोपी इरताप्पा सिद्धाप्पा बेंळोडगी (वय-45) यांला उमदी पोलिसांनी सापळा रचुन त्याच्या रहात्या गावी कराडदुडडी (ता.विजयपुर)येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले.

              पोलिसांनकडुन मिळालेली अधिक माहीती अशी,11 जानेवारी 2012 रोजी विजापुरहुन डाळींब भरुन पढंरपुरकडे विक्रीसाठी जाणार्या के.ए.-23,ए-3329 आयशर टेम्पो गाडीचा 21 जनानी पाठलाग करत वाहन चालक सोपान पाडुरंग गोडे (रा.काशिलिंगवाडी,ता.जत) याला गावठी पिस्तुल व तलवारीचा धाक दाखवत त्याच्याजवळ असलेले पैसे व मोबाईल घेऊन गाडीतील अंदाजे रक्कम 1 लाख 39 हजार रुपयांचे डाळींब लांबविले होते.घटनेदिवशी तशी फिर्याद पैगबर रमजान वज्रवाड (रा.अनंतपुर, ता.अथणी) यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.त्यावेळी डाळींब चोरी गुह्यातील 20 आरोपीना अटक करण्यात आले होते.परंतू यातील इरताप्पा सिद्धाप्पा बेंळोडगी हा आरोपी गेली 6 वर्षे पोलिसाना चकवा देत होता.उमदी पोलिस ठाण्यातील सपोंनि भगवान शिंदे,उपनिरिक्षक प्रविण संपागे, पोलिस नाईक सचिन आटपाडकर ,पोलिस शिपाई अर्जुन सगर,श्रीशैल वळसंग,संजय पावरा यांनी गोपनिय माहीतीच्या आधारे सापळा रचुन रविवारी पहाटेच्या सुमारास त्याच्या रहात्या घरातुन  ताब्यात घेतले आहे. त्याच्यावरती आर्म अक्ट नुसार गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक प्रविण संपागे करत आहेत.

Rate Card

  उमदी पोलिस ठाण्यातीन नव्याने आलेले सा.पोलिस निपिक्षक भगवान शिंदे यांनी फरारी आरोपी,अवैद्य धंदे, गुन्हेगारी कमी करण्याची मोहिम उघडली आहे.त्यामुळे कारवायात गती आली आहे. आर्मअक्ट गुह्यातील फरारी आरोपी सुभाष आमसिद्ध शेडगें रा.करेवाडी ता.जत तसेच महसुल अधिकारी यांना मारहाण करणारे 353 मधील फरारी आरोपी आमसिद्ध सरगर व नवनाथ सरगर रा.लंवगा ता.जत यांच्यासह 6 वर्षापासुन फरार असनारा आर्मअक्ट मधील आरोपी इरताप्पा सिद्धाप्पा बेळोडगी यांना सहकार्या समवेत अटक करत उमदी पोलिसांनी गुन्हेगारावरती कारवाईचा धडाका लावला आहे.

उमदी : पोलिसांना रेकार्डवरील सहा वर्षापासून फरारी आरोपी इरताप्पा सिद्धाप्पा बेंळोडगी याला अटक करण्यात आली आहे. पथकासह आरोपी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.