दिखाव्याचे जीवन जगू नका : प्रांताधिकारी तुषार ढोबरे

0

उमदी,वार्ताहर:

        विद्यार्थ्यांनी दिखाव्याचे जीवन जगू नये,जीवनात यश मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा, असे प्रतिपादन जतचे प्रांताधिकारी तुषार ढोबरे यांनी केले. ते उमदी (ता-जत)येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित,एसीएस सिनियर कॉलेजच्या बिएस्सी व बीए भाग 3 च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी बोलत होते.

          ढोंबरे पुढे म्हणाले की,सध्या भारतीय प्रशासनात ग्रामीण भागातील अधिकारी जास्त आहेत.आपल्याला जो विषय आवडतो त्यामध्येच तुम्ही रस घ्यावा,तुम्ही तुमच्या मनाशी ठरवा त्या शक्यता सर्व पातळीवर उतरणारच आयुष्याचा तार्तिक विचार केला तरच जीवनात यशस्वी होता येते.शालेय जीवनात मिळालेला गुणांचा व बुद्दीमत्तेचा अर्थाअर्थी संबंध नाही.आपल्या समोर असणाऱ्या समस्या सोडवणे म्हणजेच बुद्दीमत्ता होय समस्या सोडवणारे प्रशासनात 

Rate Card

अधिकारी हवे,तरच ग्रामीण भागातील नागरिकांचा उन्नतीस हातभार लागेल. मुलींना जेव्हा सत्यवान सावित्री, क्रांतीज्योती सावित्री फुले जेव्हा पटतील तेव्हाच महिलांना आधार मिळेल. देह इंद्रिय एकत्र करून अंतरंगातून आशा निर्माण झालेस नवीन काहीतरी करायची ऊर्जा मिळेल.ती सर्वोत्तम असेल. जगात दोनच जाती आणि धर्म आहेत. लैंगिक विषमता नष्ट करण्यासाठी समाजातील जुनाट रूढी परंपरा यांचा नायनाट करण्यासाठी स्वतः कृतीतूनच हे जगाला दाखवून द्या केव्हाही पित्याच्या प्रेमापेक्षा जातीचा प्रेम मानतात. जातीयतेच्या बेडीत अडकवून पालकवर्ग लग्न जमविताना दिसतात.परंतु त्यातील किती लग्न यशस्वी होतात असाही प्रश्न उपस्थित केला शिवाय आंतरजातीय विवाहाचे वाहिवटी त्यांनी पटवून दिले माणसांनी विचार केला तर प्रश्नच पडेल आणि प्रश्न पडला तर त्याचे उत्तर शोधण्यासाठी माणूस धडपडतो म्हणून विचार करा म्हणजे प्रश्न पडेल असा मौलिक सल्ला  देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला.

      यावेळी व्यासपीठावर प्राचार्या सुरेखा होर्तिकार, दुरुडकर सर,पत्रकार राहुल संकपाळ,महादेव कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी सुत्रसंचालन प्रा.महाडीक सर यांनी केले तर आभार प्रा.कोटगोंड सर यांनी मानले.

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या एसीएस सिनियर कॉलेजच्या बिएस्सी व बीए भाग 3 च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात बोलताना प्रांताधिकारी तुषार ढोंबरे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.