गुरुपुजा म्हणजे गुरुला पुर्ण जाणणे होय :महात्मा सतीशजी काटकर संत निरंकारी मंडळांच्या वतीने जतमध्ये गुरुपुजा दिवस व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

0

जत,प्रतिनिधी :

संत निरंकारी मंडळ चरिटेबल फौंडेशन रजि.दिल्ली शाखा जतच्या वतीने सद् गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त गुरुपुजा दिवस व स्वच्छता अभियान उत्साहात साजरे करण्यात आले.यावेळी जत येथील राममंदिर तसेच ग्रामीण रुग्णालय जत येथे संपुर्ण स्वच्छता करण्यात आली.त्यामध्ये रुग्णालयाची बाहेरुन व आतुन स्वच्छता अतररुंग्ण विभागातील बेडशीट,चादर धुलाई,लाईट दुरुस्ती,कंपाऊड रंगरंगोटी आदी उपक्रम राबविण्यात आले.कार्यक्रमास जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ शुभांगी बन्नेनवर यांनी उपस्थिती लावून स्वच्छता अभियानाचे कौतुक केले.एवढी निस्वार्थी भावनेने सेवा करणारे एकमेव मंडळ हे एक जगासमोर आदर्श निर्माण करणारे मंडळ आहे अशा भावना व्यक्त करत त्यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या यावेळी जतचे माजी नगरसेवक गिरमल कांबळे जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे,सेवादल संचालक संभाजी साळे,संचालिका संज्योती साळुंखे यांचेसह तालुक्यातील शेकडो संत महापुरुष,सेवादल बंधु भगिनी यांनी भाग घेतला.

Rate Card

सायंकाळी बचत भवन जत येथे आयोजित गुरुपुजा दिनानिमित्त सत्संगला आशिर्वाद देण्यासाठी सांगली हुन आलेले निरंकारी मंडळांचे प्रचारक महात्मा सतीशजी काटकर यांनी आपल्या प्रवचन विचार सांगताना म्हणाले की, सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन मानव कल्याणासाठी समर्पित केले आहे.गुरुपुजा म्हणजे गुरुला पुर्ण जाणणे होय, सद्गुरुने आपल्याला प्रेम, नम्रता, सहनशीलता, आपुलकी, आदरभाव व समद्रष्टी ही शिकवण दिलेली आहे.ती आपल्या जीवनामध्ये अंगीकारुन समाजामध्ये एक विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करावी तरच खऱ्या अर्थाने गुरुपुजा कार्यक्रम साध्य होईल, सद् गुरूने विश्वबंधुत्व,भाईचारा व प्रेमाची शिकवण देऊन आपले कार्य पूर्ण केले आहे.आता गरज आहे आपण त्यांच्या वचनावर चालने आवश्यक आहे.तेव्हाच मनुष्य जिवनाचे सार्थक होईल.आदी भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमास जत नगरपालिका तसेच बचत भवन जतचे व्यवस्थापक शरणाप्पा अक्की यांचे मोलाचे सहकार्य लाभले.   

संत निरंकारी मंडळांच्या वतीने जतमध्ये गुरुपुजा दिवस व स्वच्छता अभियानात ग्रामीण रूग्णालयाची स्वच्छता करण्यात आली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.