स्व.शिवाजीराव काळगी यांचे कार्य प्रेरणादायी: अरविंद वाळवेकर

0

जत,प्रतिनिधी: स्वर्गीय शिवाजीराव काळगी यांनी जत साऱख्या दुर्गम भागात शेती,व्यवसायासह समाजकारणाचे केलेले कार्य मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या पश्चातही त्यांचा नावाचे वलयं कायम आहे,असे प्रतिपादन अंबरनाथ जि.ठाणेचे शिवसेना अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी केले. ते जत कारखान्याचे संचालक कै.शिवाजीराव काळगी यांचा स्मृतीदिन कार्यक्रमात बोलत होते.येथील मुकबधीर शाळेत स्व.शिवाजीराव काळगी यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार,मन्सूर खतीब, शिवलिंगवा मठाचे महादेव महास्वामीजी,पोलिस निरिक्षक राजू तासिलदार,अॅड. प्रभाकर जाधव,डॉ.मनोहर मोदी,डॉ.शेडबाळे,डॉ.संभाजी बामणे,बसवराज हिट्टी,आणू कल्याणी,सुभाष गोब्बी,गुरूनाथ बिजरगी,प्रमोद पोतनीस,डॉ.श्रीपाद जोशी,डॉ.विजय पाटील, बाबूराव पट्टनशेट्टी,धानाप्पा ऐनापुरे, जेष्ठ नेते शंशिकात काळगी,

माजी जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी अक्की,शिवतेज संस्थेचे संस्थापक शरणाप्पा अक्की आदि मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

वाळवेकर पुढे म्हणाले,स्व. काळगी यांनी कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना,व्यवसाय,शेती व समाजकारणाची सांगड घालत केलेले काम आदर्शवत,प्रेरणादायी आहे.

सुरेशराव शिंदे म्हणाले, स्व.शिवाजीराव काळगी हे सामान्य परिस्थितीतून आलेले नेते होते. त्यांनी केलेले कार्य आजही समाजात लोकप्रिय आहे.कोणतेही वारसा नसताना ते राजकारणात यशस्वी झालेले नेते होते.

मन्सूर खतीब म्हणाले,स्व.काळगी यांनी डफळापूर येथून व्यवसाय सुरू केला होता. त्याकाळी लिंगायत समाजातून आलेले काळगी यांनी समाजकारणातून राजकारण केले. त्यामुळे त्यांना तालुक्यातील महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली.यापुढेही काळगी यांच्या कुंटूबियांना राजकारणात चांगले दिवस येतील.

प्रांरभी जत येथील मुकबधीर शाळेत विद्यार्थ्याना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीत वृक्षारोपन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी अक्की यांच्या फंडातून झालेल्या कामाची पाहणी केली.वृक्ष लागवडीबरोबर जुन्या वृक्षांचे संगोपन व्हावे म्हणून खते व औषधे झाडांना टाकून पाणी सोडण्यात आले.कै.शिवाजीराव काळगी यांच्या 8 व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.नियोजन डॉ.मल्लिकार्जून काळगी,संजय काळगी, कदम सर,प्रभाकर काडदेवर,महादेव स्वामी श्रीनिवास काळगी, यांनी केले.अरूण तंगडी,पापा कुंभार,मोहन निटवे,इराण्णा निडोणी,काळगी परिवार,शिवतेज संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.