धावडवाडी,सखंमध्ये दोन घरे फोडून लाखावर मुद्देमाल लंपास

0

संख, वार्ताहर:संख(ता.जत) गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच दिवशी चार ठिकाणी चोरीची घटना घडली.दोन घटनात रोख रक्कम,सोन्याचे दागिणे,कपडे चोरट्यानी लंपास केले. याबाबतचा गुन्हा मात्र उमदी पोलिस स्टेशनला नोंद नव्हता.

सखं दरिबडची रोडवरील राहणाऱ्या हूशेन शेख याच्या घराचे कुलूप तोडून अर्धा तोळा सोने,वीस हाजार रोख,कपडे चोरट्यानी लांबविले. मारूती लोहार हे शेतातील घरात राहिल्याने गावातील कुलूपबंद घराचा दरवाजा तोडून तिजोरी फोडली,सुटकेस मधिल तीन तोळे सोने,लहान मुलाचे चांदीचे दागिणे,सत्तर हाजार रोख व एलइडी टिव्ही चोरट्यांनी लंपास केली.बाकी दोन घटनेत किरकोळ चोरी झाल्या आहेत. आतापर्यत संखमध्ये ही चोरीची तिसरी घटना घडली आहे. पोलिसांच्या दुर्लक्षाने चोरट्याचे फावले आहे.रात्रीची गस्त वाढवावी असे मागणी आहे.दरम्यानजत,प्रतिनिधी 

तालुक्यातील धावडवाडी येथे एकाच रात्रीत आठ ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी 2 ग्राम सोने व प्रापंचिक साहित्य असा सुमारे 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे . ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी यासिन गुलाब शेख यानी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Rate Card

      याबाबत अधिक माहिती अशी की , शब्बीर जैनुद्दीन शेख , राजुद्दीन इब्राहिम शेख , जन्नतबी मौला शेख , मन्सूर भिकू शेख , मुकतार हानिफ शेख , हुशालदिन लालासो सोनिकर , शब्बीर रेहमान शेख , बशीर जैनुद्दीन शेख , हे सर्वजण व्यवसायानिमित्त परगावी रहातात  या संधिचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी बंद घरांचे कडी कोयंडा कटावणीने तोडून घरातील मुद्देमाल लंपास केला आहे. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.
 संख ता.जत येथील चोरट्यांनी घर फोडून तिजोरीतील साहित्य असे विस्कटले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.