कौंटुबिक वादातून पत्नीचा खून माडग्याळ मधील घटना : राहत्या घरी गळा आवळला ;संशियत पती व सवत ताब्यात

0

कौंटुबिक वादातून पत्नीचा खून

माडग्याळ मधील घटना : राहत्या घरी गळा आवळला ;संशियत पती व सवत ताब्यात

माडग्याळ/उमदी,वार्ताहर:माडग्याळ (ता.जत) येथे कौटुंबिक वादातून राधाबाई तिप्पाण्णा माळी (वय-50) रा.माडग्याळ हिचा राहत्या घरी गळा आवळून,व विळ्या,दगडाने डोक्यात ठेचून जागीच खून करण्यात आला.घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.मयत राधाबाईचा भाऊ शरणाप्पा विठ्ठल कोरे यांनी फिर्याद दिल्यावरून याबाबतचा गुन्हा उमदी पोलिसात दाखल झाला आहे.दरम्यान संशियत पती तिप्पाण्णा गंगाराम माळी (वय-55) व सवत कमलाबाई माळी (वय-40)यांनाा उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,मयत राधाबाई यांचा तिप्पाण्णा माळी याच्यांशी वीस वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर काही वर्षापर्यंत दोघाचा संसार सुरळीत होता. त्यानंतर या दोघात कौटुंबिक वाद झाला होता. त्यामुळे मयत राधाबाई माळी ह्या गेल्या 10-11 वर्षापासून माहेरी भावाजवळ उटगी येथे पतीपासून वेगळ्या राहत होत्या. त्यानंतर पती तिप्पाण्णा गंगाराम माळी यांनी विमलाबाई हिच्याशी दुसरा विवाह केला.दरम्यान गावातील काही पंच लोकांनी मयत राधाबाई व तिप्पाण्णा यांच्यात मध्यस्थी करून वाद मिटविला होता.राधाबाई पुन्हा माडग्याळ येथे तिप्पाण्णा सोबत राहू लागल्या होत्या. सुरुवातीच्या काही दिवसानंतरच पती तिप्पाण्णा व सवत विमलाबाई यांच्याबरोबर दररोज राधाबाईचा कोणत्याना कोणत्या कारणावरून वाद होऊ लागला. दररोजच्या भांडणाला कंटाळून तिप्पाण्णा व विमलाबाई या दोघांनी मिळून राधाबाई हिचा गुरुवारी मध्यरात्री गळा आवळला, व नंतर विळ्याने वार करून निर्घुण खून केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.दरम्यान घटनास्थळी पती संशियत आरोपी तिप्पाण्णा माळी,सवत विमलाबाई उपस्थित होते. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी ताब्यात घेऊन पोलिस खाक्या दाखवताच त्यांनी खून केल्याचे कबूल केल्याचे समोर आले आहे.घटनास्थळी जत उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुर्डे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व उमदी पोलीस ठाण्याचे सपोनि भगवान शिंदे व पीएसआय पी. एम सापंगे यांना पुढील तपासासाठी निर्देश दिले. पोलिसांकडून घटनास्थळावरून रक्ताचे नमुने व इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले असून मृत्तदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयाला पाठविले. या खुनाचा अधिक तपास सपोनि भगवान शिंदे करीत आहेत.


Rate Card

खून केल्यानंतर आपल्यावर खुनाचा संशय येऊ नये म्हणून संशयित आरोपी पती तिप्पाण्णा गंगाराम माळी व सवत विमलाबाई तिप्पाण्णा माळी या दोघांनी राधाबाईच्या मृत्तदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.मात्र पहाटेच्या वेळी ये-जा करणाऱ्या काही नागरिकांची चाहुल लागल्याने मृत्तदेह शेजारच्या घरासमोर टाकून संशयित आरोपीने तेथून पळ काढला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.