जत शहरात एकच फँन्सी नंबर प्लेटची दुचाकी सापडली जत वाहतूक शाखेची किमया : दररोज शेकडो दुचाकी बिगर नंबर प्लेट, फॅन्सी नंबरच्या शहरात धावतात पण दिसली एकच

0

जत,प्रतिनिधी : जत शहरात फॅन्सी दुचाकी शेकडो मुख्य मार्ग,पोलिस स्टेशन समोरून धावतात. पंरतू गेल्या अनेक महिन्यापासून जत शहरात पोलिसांना फँन्सी नंबर एक गाडी सापडली आहे.

जत शहरात वाहतूकीच्या व भविष्यातील गुन्हेगारी रोकण्याच्या दृृष्टीने मोहिम सुरू आहे.जत पोलिसांच्या वाहतूक विभाग त्यासाठी कार्यरत आहे. थेट शहरातून गाडीच्या टपावरून अवैद्य वाहतूक सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत शहरात तपासणी अंती शुक्रवारी दिवसभरात एकच फँन्सी नंबर प्लेटची दुचाकी वाहतूक शाखेच्या पथकाला सापडली,हे विशेष..

Rate Card

जत शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तिनतेरा झालेले असतानाही वाहतूक विभागाचे पोलिस अपवदाने शहरातील मार्गावर दिसतात. शहरात,विडेवाकडे नंबर टाकलेल्या,दादा,आण्णा,आबा,साहेब असे नंबर प्लेटवर नावे लिहलेली,अल्पवयीन दुचाकी स्वार, ट्रिबल शिट,विना नंबरच्या शेकडो दुचाकी शहरासह थेट पोलिस स्टेशन समोरून फिरतात. मात्र त्याकडे पोलिसाचे लक्ष नसते किंबहुना दिले जात नाही. मात्र शुक्रवार याला अपवाद ठरला एका महापुरूषाचा फोटो लावला व नंबर प्लेट नव्हती म्हणून एका दुचाकीला हाजार रूपयाच्या दंडाची नोटिस दिली गेली.मात्र दुसरीकडे दिवसभर अनेक बड्या धेंड्याच्या गाड्यांना अडवायचे धाडस हेच पोलिस दाखविताना दिसत नाही. अनेक युवक गाडी अडवली की कुणाला तरी फोन केला की गाडी सोडली जाते. शहरात कधीही दुचाकी स्वार नियम पाळत नाहीत.अल्पवयीन मुले अवजड दुचाकी पोलिसासमोरून भुर करून घेऊन जातात. त्याच्यांवर कधी कारवाई झाल्याचे ऐकवत नाही. मात्र गरिब,मजूर असणाऱ्या सामान्याच़्या गाड्यांना हाजार रूपये दंड केला जातो हे विशेष..

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.