जत तालुक्यातील 23 संस्थावर गुन्हा चारा छावणी घोटाळा : बड्या नेत्याचा समावेश : संस्था काळ्या यादीत
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सन 2012-13,2013-14 साली सुरू असलेल्या चारा छावणीत शासनाचे आदेश डावलत अनियतता केल्याप्रकरणी तालुक्यातील विविध गावातील 23 संस्थांना काळ्या यादीत टाकत छावणी चालकावर फौंजदारी गुन्हा जत पोलिसात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

तहसिलदार अभिजित पाटील यांनी याप्रकरणी फिर्यादी दिली आहे.
राज्यभरात 2012-2014 पर्यत अनेक छावण्या सुरू होत्या.छावणी चालकांकडून जनावरांना बारकोड,कुपण/गव्हाण आदि सोयी पुरविण्याचे बंधपत्र मंजूरी देताना घेतले होते. तरीही छावणी चालकांनी सर्व नियम ढाब्यावर बसविले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयात या छावण्याची तपासणी करून कारवाई करावी अशी रिट याचिका दाखल झाली होती. त्यावर निकाल देताना न्यायालयाने सरकारला चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार महसूल विभागाने हे पाऊल उचलले आहे.
जत तालुक्यातील जि.प. समाजकल्याणचे माजी सभापती आकाराम मासाळ(बाज), शेगावचे माजी संरपच कृष्णदेव बोराडे,यांच्यासह 23 जणाचा समावेश आहे.
तालुक्यातील संस्था व त्याचे चालक जय हनुमान बहुउद्देशीय विकीस संस्था माधवनगरवाडी (बाज) पल्हाद हैबती गडदे.उत्कर्ष मल्टीपर्पज चँरिटेबल सोसायटी आंवढी,संभाजी रामचंद्र कोडक.विठ्ठल शिक्षण संस्था शिंगणापूर, रामचंद्र बाबासो पाटील. मल्लिकार्जून मजूर सहकारी लि.बसर्गी,मल्लिकार्जून शिवबसू पटेद.वाळेखिंडी सर्व सेवा सोसायटी लि.वाळेखिंडी, अनिल पांडूरंग शिंदे.राजारामबापू पाटील सह.साखर कारखाना राजारामनगर,पांडूरंग शामराव पाटील.बाबासाहेब आण्णा पाटील कला,क्रिडा व सांस्कृतिक व्यायाम मंडळ कुडणूर,पोपट दाजी पाटील. जय भवानी महिला सहकारी दुध उत्पादक संस्था अंत्राळ,जयश्री संजय माने.सुशीलकुमार सेवाभावी संस्था बाज,आकाराम नामदेव मासाळ.लोहगाव सर्व सेवा सह.सोसायटी लोहगाव,समाधान दिगबंर काशीद.रेवनाळ दुध उत्पादक संस्था रेवनाळ भागवत बाळू टकले.पांडूरंग पाणी वापर सह.संस्था येळवी,दादासो कृष्णा माने.शिवबाराजे फौंडेशन बेवनूर,सुधिर तुकाराम नाईक.ग्रामविकास वाचनालय सिंदूर,सौ.सत्यवती श्रीशैल मगदूम.जय हनुमान सर्वाजनिक वाचनालय खैराव,सखाराम आबाजी घुटूगडे.कंठी ग्रामीण सर्व सेवा सह.सोसायटी कंठी,रावसाहेब राधू मोटे.जिरग्याळ सर्व सेवा सोसायटी जिरग्याळ, हुल्याप्पा पांडूरंग पाटील.अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था गुळवंची,बाळासो रामचंद्र येडगे.श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था शेगाव,लक्ष्मण नामदेव बोराडे.मल्लिकार्जून शैक्षणिक व सामाजिक विकास प्रतिष्ठान खोजानवाडी,सिद्रया गुरबसू काराजनगी.सोनारसिध्द ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नवाळवाडी,श्रींमत सोपान सुर्यवंशी.जयभवानी शिक्षण संस्था, बेंळूखी सुधाकर रामू माळी.माणगंगा सहकारी साखर कारखाना लि.सोनारसिध्द नगर आटपाडी,सुर्यकांत ईश्वरा सांवत,वायफळ