बनाळीतील राहूल लोंखडे यांचा संशास्पद मुत्यू
जत,प्रतिनिधी : बनाळी-सांवतवाडी रोडवर ट्रक्टरमधून पडून एका तरूणांचा जत येथे उपचार्थ आणत असताना मुत्यू झाला.राहूल शिवाजी लोंखडे (वय-20,रा.बनाळी) असे मुत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी अमोल सांवत यांने दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी, शनिवारी पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान बनाळीहून – सांवतवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रक्टर मध्ये बसलेला राहूल खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने त्याला जतला उपचार्थ आणत असताना त्यांच्या वाटेत मुत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.मात्र घटना संशास्पद असल्याची चर्चा सुरू आहेत. अधिक तपास राजू कांबळे करत आहेत.दरम्यान राहूल यांचा घातपात झाल्या असण्याची शक्यता कुंटूबियांनी व्यक्त केली आहे.त्यांची सखोल चौकशीची मागणीही केली.
