जत नगरपरिषदेच्या विषय समितीच्या निवडी घोषित भुप्रेद्र कांबळे, संतोष कोळी,टिमू ऐडके,आप्पासाहेब पवार,भारती जाधव,आश्विनी माळी सभापती

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या विषय समितीच्या निवडी शुक्रवारी पार पडल्या.नगरपरिषदेवर सध्या कॉग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सभापती निवडीत तीन तीन विषय समित्या वाटून देण्यात आल्या आहेत. त्यात बांधकाम,शिक्षण,महिला-बालकल्याण कॉग्रेसकडे तर स्वच्छता,नियोजन-विकास समिती,पाणीपुरवठा समितीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची वर्णी लागली आहे.सार्वजनिक बांधकाम सभापती  भुप्रेद्र कांबळे(कॉग्रेस-बसप),शिक्षण,क्रिडा व सांस्कृतिक संतोष उर्फ संतोष कृष्णा कोळी(कॉग्रेस),स्वच्छता वैधक,आणि सार्वजनिक आरोग्य समिती  लक्ष्मण एडके(राष्ट्रवादी),पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती भारती प्रविण जाधव(राष्ट्रवादी)नियोजन व विकास समिती आप्पासाहेब दुर्गाप्पा पवार(राष्ट्रवादी),महिला व बालकल्याण अश्विनी चंद्रकात माळी(कॉग्रेस) यांची बिनविरोध निवडी संपन्न झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी काम पाहिले. या सभापतीची नियोजन समिती सदस्य म्हणून म्हणून निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत कॉग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला होता. तर त्रिशंकू स्थितित कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. सध्या राष्ट्रवादीचे आपिपा पवार उपनगराध्यक्ष आहेत. निवडीनंतर सभापतीच्या समर्थकांनी फटाक्याच्या आतिषबाजीत गुलालाची उधळन जल्लोष केला.दरम्यान भाजपचे गटनेते म्हणून विजय ताड यांची निवड निश्चित झाले आहे. भाजपचा स्विकृत्त नगरसेवक निवड ता.12 फेंब्रुवारीला नियोजित आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.