मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे जागतिक पातळीवर साजेल असे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

0

Rate Card

कवटेमहाकांळ : मुलांच्या कला गुणांना वाव देऊन गुणवत्तापूर्ण  विकास करणाऱ्या

 महाराष्ट्रातील काही ठराविक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूल मध्ये मोहन माळी इंटरनॅशनल  स्कूलची गणना केली जात आहे.त्यालाच साजेसा असा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. स्कूलच्या भव्य अशा प्रांगणामध्ये स्नेहसंमेलन संपन्न झाले

स्नेहसंमेलनाची यावर्षीची थीम भारतीय लोकसंस्कृती ही होती.प्रमुख पाहुण्या पाहुण्या ज्येष्ठ कवी,लेखिका प्राध्यापिका सौ.नीलिमा माणगावे, प्रा.अनिल पाटील,कवठेमहांकाळचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ शंकर भोसले, संस्थेचे चेअरमन मोहन माळी,व्हाय.चेअरमन स्मिता माळी,संचालक युवराज माळी,नंदकुमार माळी,

मुख्याधिपिका कविता मेहरा यांनी कार्यक्रमाची सरस्वती पुजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.मान्यवरांच्या स्वागतासाठी मुलांनी अप्रतिम असे स्वागत नृत्यही सादर केले. भारतीय लोकसंस्कृती म्हणजे काय भारतामध्ये किती राज्ये आहेत 

व प्रत्येक राज्याची संस्कृती कशा पद्धतीची आहे.प्रत्येक राज्यातील लोक कशा पद्धतीने राहतात त्यांच्या वेशभूषा,राहणीमान, त्यांची जीवनशैली,त्यांचे भोजन या सर्व गोष्टी व भारतीय लोकसंस्कृतीचे वैविध्य मुलांच्या लक्षात यावे म्हणून स्नेहसंमेलनाची या वर्षीची थीम भारतीय लोकसंस्कृतीला साजेशी अशी ठेवली होती.मुले वेगवेगळ्या राज्यांच्या वेशभूषेमध्ये रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून नृत्यामध्ये सामील झाली होती.कश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत चे नृत्याविष्कार मुलांनी या वेळी सादर करत सर्व पालकांचे मान्यवरांचे मनोरंजन केले यावेळी महाराष्ट्र ,कर्नाटक, पंजाब ,राजस्थान ,आंध्र प्रदेश, तमिळनाडु ,गोवा केरळा ,हरियाणा, राज्याचे नृत्याविष्कार मुलांनी सादर केले.या वेळी देशभक्तीपर गीते पारंपारिक लोकनृत्ये नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या.स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमही घेण्यात आला. 

यावेळी शालांतर्गत ,शाळाबाह्य,जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळावणार्या  विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन  गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या 

नीलम माणगावे म्हणाल्या की,प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या व परिसरातील लोक शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध व्हावे म्हणून धडपडणाऱ्या मोहन माळी यांनी माळरानावरती लावलेलं हे ज्ञानरुपी रोपटं दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांना याची फळे चाकायला मिळतील.

कवठेमहांकाळचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ शंकर भोसले म्हणाले, अभिनव फाउंडेशनने हाती घेतलेले हे शैक्षणिक कार्य याचे भविष्यात खूप मोठे स्वरूप प्राप्त होणार आहे. मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल हे एक दिवस लोकविद्यापीठ होणार त्यादृष्टीने अभिनव फाउंडेशनची वाटचाल सुरू आहे.त्यात अध्यक्ष मोहन माळी हे शंभर टक्के यशस्वी होणार यात तिळमात्रही शंका नाही.

प्रा.मा.अनिल पाटील म्हणाले, स्वातंत्र्य मिळवताना गांधीजींनी संपूर्ण देशवासियाना “खेड्याकडे चला” असा संदेश दिला होता.त्याचा प्रत्यय मोहन माळी मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल पाहिल्यानंतर आला.सर्व वर्गखोल्या संगणक आणि डिजीटल साधनांनी सुसज्ज आहेत.दप्तर ओझे हद्दपार हि संकल्पना राबविताना प्रत्येक विद्यार्थ्यांस स्वतंत्र लाॕकर दिले आहेत.इटरकाॕम बससेवा उपलब्ध असल्याने घरापासून स्कूलपर्यंत नि स्कूलपासून घरापर्यंत विद्यार्थ्यांचे सुरक्षित येणेजाणे होत रहाते.त्याचबरोबर प्रशिक्षित शिक्षकांच्यामुळे शाळेचा परिसर आतून बाहेरुन खूपच सुंदर झाला आहे.कवठेमहंकाळसारख्या दुष्काळी तालुक्यात सर्वसोयींनीयुक्त असे स्कूल उभा करण्यापाठीमागे खूपमोठी शैक्षणिक तळमळ आणि विकासाची दृष्टी दिसून येते.मोहन माळी हे खऱ्याअर्थाने महात्मा गांधीजींचा संदेश खेडेगावातील माणसांच्यापर्यंत पोहचवत आहेत.असे म्हणून त्यांनी स्कुलच्या शैक्षणिक कार्यास सुयश चिंतले.


यावेळी स्नेहसंमेलन पाहाण्यासाठी प्रचंड संख्येने जाणकार पालकवर्ग उपस्थित होता मुख्याध्यापिका सौ. कविता मेहरा मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. स्नेहसंमेलनाचे संपूर्ण नियोजन मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.कविता मेहरा व सर्व शिक्षक,शिक्षिका,सर्व कर्मचारी वर्ग यांनी आहो रात्र कष्ट घेऊन केले.


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.