निधड्या छातीने जवान सिमेवर लढतात म्हणून आपण सुरक्षित आहोत आ. विलासराव जगताप : हिवरे येथील अतिरेक्यांशी लढताना जखमी झालेल्या मलमेचा सत्कार

0

जत,प्रतिनिधी : सीमेवर अतिरेक्यांचा निधड्या छातीने मुकाबला करून देशसेवा करणाऱ्या जत तालुक्यातील जवान समाधान मलमे यांना सलाम करताना अभिमान वाटतो. तालुका त्यांचा कायमचा ऋणी राहील अशा शब्दात जखमी जवानांची भेट घेऊन आमदार विलासराव जगताप यांनी जवाना प्रती कृत्रज्ञता व्यक्त केली.मलमे यांचा आमदार विलासराव जगताप यांनी सत्कार केला.

हिवरे येथील सीआरपीएफचे जवान समाधान मलमे घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करताना गोळी लागून जखमी झाले आहेत. उपचारांनंतर ते गावी आले, असता आमदार विलासराव जगताप यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी जवान मलमे यांनी अतिरेक्यांशी लढताना सांगितलेला प्रसंग अंगावर शहारे आणनारा आहे. 

जवान मलमे यांचा रिझर्व्ह पोलीस दलात  (सीआरपीएफ) जवान आहेत. ते जम्मू काश्मीर राज्यातील श्रीनगर जवळील पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे असलेल्या सिआरपीएफच्या कॅपचे सदस्य आहेत. येथे 650 एकर क्षेत्रावर कॅप जवळ डोंगराळ व घनदाट जगलं आहे. याचा गैरफायदा घेऊन 30 डिसेंबरला तीन अतिरेक्यांनी घुसखोरी करून कॅम्पवर बेछुट गोळीबार केला. यावेळी जवान मलमे आपल्या सहकार्यासह देशसेवा बजावत होते. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात मलमे यांच्या मानेला गोळी लागली. जीवाची पर्वा न करता जखमी अवस्थेत त्यांनी अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यानंतर येथील जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. प्रकृती बरी झाल्यानंतर मलमे गावी आले आहेत.

Rate Card

आमदार विलासराव जगताप म्हणाले, सीमेवर प्राणाची पर्वा न करता देशाचे संरक्षण करणाऱ्या जवनामुळे आपण निर्धास्त आहोत. डोळ्यात तेल घालून कशाची पर्वा न करता प्रमाणिकपणे सेवा करणारे जवान हीच आपली ताकद आहे. प्रसंगी प्राणांची आहुती देणारे जवान येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक आहेत. जखमी असूनही प्राण पणाला लावून अतिरेक्यांचा खात्मा करणाऱ्या मलमे यांना हा तालुका सलाम करतो. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी तालुक्यातील प्रत्येजण प्रार्थना करत आहेत. जवान जरी सीमेवर असेल तरी त्यांच्या कुटूंबियाबरोबर सर्वजण आहोत अशी भावना व्यक्त करून समाधान मलमे यांचा सत्कार केला व त्यांच्या नातेवाईकांना आधार दिला.यावेळी दगडू शिंदे,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील भागवत शिंदे आदी उपस्थित होते.

हिवरे येथील अतिरेक्यांशी लढताना जखमी झालेल्या समाधान मलमेचा यांचा आमदार विलासराव जगताप यांनी सत्कार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.