सकटे दापत्यांस यंदाचा श्रींमती गिरेव्वाबाई ऐनापुरे आदर्श माता-पिता पुरस्कार

0

जत,प्रतिनिधी:परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना डॉक्टर, वरिष्ठ अधिकारी बनविणाऱ्या जत शहरातील जनाबाई व सिताराम सकटे या दांपत्यास यंदाचा श्रींमती गिरेव्वाबाई बाबूराव ऐनापुरे आदर्श माता-पिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

येथील दि फ्रेंडस् असोसिएयन या नामांकित शिक्षण संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.गदिमा स्मृति-व्याख्यानमालेच्या दरम्यान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सकटे दापत्यांना प्रधान करण्यात आला.

Rate Card

माता-पिता म्हणून उल्लेखनीय काम करणाऱ्यां माता-पित्याना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यंदा देण्यात आलेल्या सकटे दापत्यांचे कार्यही आदर्शवत आहे. सामान्य परिस्थिती असताना काबाडकष्ठ करून त्यांनी त्यांच्या मुलांना डॉक्टर, अधिकारी बनविले आहे. आई वडीलाचे यशस्वी कतृत्व पार करत त्यांनी आपले कुंटूब आदर्शाचे भांडार बनविण्याचे काम केले आहे. त्यांचे मोठे चिरजिंव अरविंद हे दुरसंचार विभागात उपविभागीय अभिंयते पदावर कार्यरत आहेत.दुसरे चिरजिंव डॉ. राजेश सकटे हे जतमधील पतिथयश डॉक्टर आहेत. त्यांचा यशश्री हॉस्पिटल हा दवाखाना आहे. ते अनेक सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात.तर तिसरे चिरजिंव अनिल फार्माशिस्ट आहे. कन्या शिक्षिका आहेत.सामान्य कुंटूबातील या दांपत्याने स्वत:चे शिक्षण नसतानाही आपल्या मुलावर चांगले संस्कार करून उच्चशिक्षित बनविले आहे.व्यवसाय व कष्ठाची प्रंचड कामे त्यांनी केले आहे. अशिक्षित असतांनाही आदर्श माता-पिता बनत त्यांनी आपल्या मुलांना उच्चपदावर पोहचविले आहे.समाजासमोर आदर्श घालून दिला आहे. व्यसनात गुरफटलेल्या समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे त्यांना तालुक्यातील हा सर्वोच्च बहुमान बहाल केला आहे. संस्थेचे अध्यक्ष जी. बी. ऐनापुरे, प्रा. अशोक केसरकर, अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, डॉ. मदन बोर्गीकर आदि मान्यवर उपस्थित होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.