मुंचडीतील शेतकऱ्यांचे आश्वासनानंतर बेमुदत उपोषण अखेर मागे
जत,प्रतिनिधी: मुचंडी यथे मंजूर झालेला साठवण तलावाचे काम तातडीने सुरू करावे. दडपशाहीने सुरू असलेला नवीन सर्व्हे तातडीने थांबवावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवार पासून जत तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे उपोषण कर्त्याचे म्हणणे होते.मंगळवारी तहसिलदार अभिजित पाटील यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत लघुसिंचन जलसंधारणाचे विभागीय अभिंयता बि.एम.तेली,राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, रमेश पाटील व उपोषण बसलेले शेतकऱ्यांत चर्चा घडवून आणली. प्रशासन व शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत तातडीने योग्य कारवाई करण्याचे संबधित यंत्रणेला आदेश दिले. उपोषण कर्त्याना जलसंधारण विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. विजय काटे, महादेव बिज्जरगी, शेखर सौंदत्ती, तम्माण्णा शिंदे, बा
बू मंगसूळी, दुंडाप्पा अरगी व लक्ष्मण सौंदत्ती हे शेतकरी उपोषणास बसले होते. गावातील नागरिकांनी त्यांना मोठा पांठिबा दिला. अंदोलकांचे तलावाचे काम तातडीने व्हावे,नविन सर्व्हे थांबवावा. आदि मागण्या आहेत.
फोटो

मुंचडी येथील साठवण तलाव प्रकरणी सुरू असलेले शेतकऱ्यांनी उपोषण मंगळवारी मागे घेण्यात आले.जलसंधारणाच्या अंभियते शेतकऱ्यांना लेखी पत्र देताना.
