जतचे पुर्व भागातील पाणी योजनेसाठी आ. विलासराव जगताप, कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांचे एकत्रित प्रयत्न

0

जत,प्रतिनिधी : जतच्या विकासासाठी पक्षभेद विसरून आमदार विलासराव जगताप, कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सावंत एकत्र आले आहेत. आघाडी सरकार पासून जत पुर्व भागातील 42 गावाच्या कर्नाटकातील आंतराज्यीय पाणी योजनेतून पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले कॉग्रेस नेते सांवत यांनी त्या योजनेसाठी पाठपुरावा आजही कायम ठेवला आहे. दरम्यान 

Rate Card

खा. संजय पाटील व जतचे आमदार विलासराव जगताप यांनीही हि योजना जत पुर्व भागाचा कायापालट करू शकते, यामुळे सरकार दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला बऱ्यापैंकी यश येत असल्याचे चित्र आहे. नुकतीच दोन्ही नेत्यांनी विकासाच्या या महत्वपुर्ण योजनेसाठी एकत्र येत कर्नाटकातील जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांची भेट घेत योजनेची माहिती, कशा पध्दतीने पाणी येऊ शकते यांची सर्व माहिती मंत्री पाटील यांना दिली आहे.प्रथमपासून कॉग्रेस नेते विक्रम सांवत हे या योजनेसाठी प्रयत्न करत असल्याने सर्व तांत्रिक बाबी,अडचणीची पुर्ण माहिती मंत्री पाटील यांना सांगितली.आमदार विलासराव जगताा हे मुळात

अभिंयता असल्याने परिपुर्ण माहिती व आराखाडा नकाशासह त्यांनी शासनाला सादर केला आहे.ते जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांचे फलित म्हणून दोन्ही राज्याच्या मंञ्यांची बैठकही ठेवण्यात आली आहे. त्यातच कॉग्रेस व भाजपच्या नेत्याकडून एकत्रित प्रयत्न सुरू झाल्याने योजनेच्या कामाला गती येणार असल्याचे चित्र आहे. 

जतचे पुर्व भागातील पाणी योजनेसाठी आ. विलासराव जगताप, कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांचे एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून जिल्ह्याचे खा. संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांनी कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांची भेट घेत पाणी योजनेच्या आराखड्यासह माहिती दिली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.