डफळापूरातील मोफत आरोग्य शिबिराला तुफान प्रतिसाद,1160 रुग्णांनी लाभ घेतला
जत,प्रतिनिधी : डफळापूर(ता.जत)येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आ.पतंगरावजी कदम व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या हस्ते झाले.
डफळापूर येथील सवदे बंन्धू हॉलमध्ये हे शिबिर ठेवण्यात आले होते. शिबिराला परिसरातील रुग्णांनी तुफान गर्दी केली होती. मोठा प्रतिसाद मिळाला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, बाजार समिती सभापती अभिजित पाटील,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी,आप्पाराया बिराजदार, आप्पा मासाळ,डॉ. अभिजित चोथे आदि मान्यवर उपस्थित होते.या वेळी बोलताना विक्रम सावंत म्हणाले कि,परिसरातील गरजू

नागरिकांना व्याधी मुक्त व निरोगी आयुष्य जगता यावे,हाजारो रुपयाचा खर्च सामान्य आजारांवर करावा लागतो. तो थांबवा,नेमके निदान होऊन आजारातून रुग्णांनी मुक्कता व्हावी असे उद्देशाने हे शिबिर आयोजित केले सांवत म्हणाले. शिबिरात विविध आजारावरील 1160 रुग्णांनी लाभ घेतला. अनेक आजारांवर थेट उपचार करत औषधे वाटप करण्यात आली. काहीं रुग्णांना शस्ञक्रियेसाठी भारती हॉस्पिटल येथे दाखल होण्याच्या सुचना देण्यात आल्या. तेथे शस्ञक्रियाही मोफत केली जाणार आहे.
