शिक्षण आणि आरोग्य विभागासाठी 35 कोटीचा निधी उपलब्ध: सभापती तम्मणगौडा रवी-पाटील

0

जत,(प्रतिनिधी)-

शिक्षण विभागातील शाळा खोल्या बांधकाम,दुरुस्ती,पायाभूत उपक्रम, शाळा कंपाऊड आणि संगणक आणि अक्टिव्हिटीज बेस लर्निंग या  कामांसाठी 19 कोटी  रुपये तर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील विविध योजनांसाठी 16 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग सक्षम व्हावा,यासाठी माझे प्रयत्न सुरू असून यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने माझी धडपड सुरू आहे. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनीही आपल्या प्रामाणिक प्रयत्नाला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या विभागाला चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध होत आहेत. 

Rate Card

सांगली जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळांना अजूनही वर्गखोल्यांची कमतरता असून नवीन शाळा खोल्यांसाठी 14 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय शाळा खोल्या दुरुस्तीसाठी 3कोटी, अकवेस्टर बेसलाइन 2कोटी, संगणकांसाठी दीड कोटी आणि शाळा कंपाऊंडसाठी 50 लाख रुपये उपलब्ध झाले आहेत.शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि शाळांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध व्हावेत,यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकारी वर्गांच्या सहकार्यातून आपले प्रयत्न राहणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बालगाव येथील विक्रमी उपस्थितींचा योग शिबिर कार्यक्रम, स्काऊट-गाईड मेळावा आणि विज्ञान प्रदर्शन या माध्यमातून जत सारख्या दुष्काळी तालुक्याला नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. असे आणखी  उपक्रम शिक्षण विभागाच्या माध्यमातून जत तालुक्यात घेण्याचा आपला मानस आहे.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध योजनांसाठी

16 कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला असल्याचेही श्री. तम्मणगौडा रवी-पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.