बहुचर्चित, रहस्यमय ‘राक्षस’ चा टीजर लाँच

0

जंगल ना गाणं कधी ऐकलंय का?’ असा प्रश्न विचारत गूढ अशा आगामी राक्षस’ या मराठी चित्रपटाचा जबरदस्तउत्कंठावर्धक टीजर आज लाँच करण्यात आला आहे. नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन‘ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांची समित कक्कड फिल्म्स‘ प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित राक्षस‘ ने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती ती आता या टीजर मुळे आणखी वाढली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी राक्षसच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे. या टीजर मधून राक्षसही आदिवासीजंगल या भोवती फिरणारी कथा असल्याचे दिसते. आदिवासी पाड्यावर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. “जंगल गाणं गातंते हसतं – रडतं त्याला भावना असतात” असे यात म्हटले आहे तर दुसरीकडे एक मुलगी आपल्या आईला म्हणतेय आई,बाबांना जंगलातल्या राक्षसाने गिळलंय’. या संवादामुळे गूढ वाढलेल्या ‘राक्षस’ मध्ये नक्की काय रहस्य दडलेले आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

दरम्यान, ‘राक्ष चित्रपटात शरद केळकरसाई ताम्हणकर यांच्या बरोबरच ऋजुता देशपांडेदयाशंकर पांड्येविजय मौर्ययाकूब सैदपूर्णानंद वांदेकर आदींच्या भूमिका आहेत. 

घनदाटकिर्रर अशा जंगलात नक्की काय घडलं आहेआणि या राक्षस’ मध्ये नेमकं काय रहस्य आहेहे येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना कळणार आहे.

Rate Card

दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.