नाटक ” अंदाज आपला आपला ,, मनोरंजन आपले आपले ,,

0
8


अंदाज ह्या शब्दामध्येच सारे काही दडलेलं असतंआपण केलेलं निदान ते ” निदान ” बरोबर यावे यासाठी अंदाज बांधावा लागतोम्हणजे पुन्हा जर तर चे प्रश्न उभे राहतातअसे बरेचसे अंदाज आपले बरोबर येतातहीच जीवनामधील गंमत आहेप्रत्येकजण पुढचा विचार करताना आपल्या अभ्यासानुसार नक्की काय करायचे याचे ठोकताळे अंदाज बांधत असतोत्याप्रमाणे कामाची आखणी करतो कधीकधी मनाशी बांधलेले अंदाज चुकतातमग त्यावर प्रश्न निर्माण होतात आणि मग त्याची उत्तरे आपण आपल्याशीच शोधण्याचा प्रयत्न करतोआपल्यावर संकट आले कि आपण ज्योतिषाकडे धाव घेतोअसे कसे झाले पुढे काय होणार ह्याची विचारणा करतोज्योतिषी सुद्धा आजूबाजूचा विचार करून कुंडली पाहून ” अंदाज ” सांगतोहाच धागा पकडून लेखक राजेश कोळंबकर यांनी लिहिलेलं ” अंदाज आपला आपला ” हे नाटक निर्माते विनय गोपाळ अलगिरीकिशोर सावंतविवेक नाईक यांनी वेद प्रोडक्शन निर्मित किवी प्रोडक्शन या नाटयसंस्थे तर्फे सादर केलं आहेदिगदर्शन संतोष पवार यांचे लाभले आहेनेपथ्याची बाजू प्रदीप मुळ्ये यांनी सांभाळलेली असून प्रकाश योजना विनायक तांबेकिशोर इंगळे यांची आहेसंगीत साई पियुष यांचे असून वेशभूषा अंजली खोबरेकर यांची आहेया मध्ये माधवी गोगटेअक्षय केळकरमधुरा देशपांडेसंतोष पवार या कलाकारांच्या भूमिका आहेत.

ज्योती माळगावकर ह्या ज्योतिष जाणणाऱ्या बाईआपल्या पतीच्या निधनानंतर त्यांचा हा व्यवसाय त्या पुढे सांभाळीत असतातखराडे नावाचे गृहस्थ त्यांना ह्या कामी मदत करीत असतातज्योती बाईंना गुणप्रिया नावाची एक मुलगीती कॉलेजमध्ये जाणारीपण तिचा ज्योतिषावर विश्वास नाहीत्यामुळे माय – लेकी मध्ये खटके उडतातआपला हा व्यवसाय कोणीतरी पुढे सांभाळायला हवा असे वाटत असताना त्यांच्या दारात समीर नावाचा मुलगा ज्योतिष शिकण्यासाठी येतोखराडे ज्योतीबाईंना सल्ला देतात त्याला ज्योतिष शिकवा आणि जावई करून घ्याज्योतिष शिकताना तो प्रश्नावर प्रश्न त्यांना विचारतोत्या सुद्धा त्याच्या प्रश्नाला उत्तरे देतातगुणप्रिया आणि समीर हे एकमेकांना पसंत करतील अशी आशा त्यांना असतेगुणप्रिया ज्योतिष पेक्षा विज्ञानाला महत्व देतेग्रहतारेकुंडली या विषयी अनेक प्रश्न ती विचारतेहे सारे खुमासदारपणे गंमतीदारपणे मनोरंजन करीत मांडले आहेविज्ञान आणि ज्योतिष हे आपापल्या जागी योग्य आहे.

शेवटी समीर आणि गुणप्रियाचे एकमेकांशी पटते का समीरला ज्योतिष शास्त्रात खरंच रस असतो का त्याचे प्रश्न नेमके काय शोधत असतात अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मनोरंजकतेने नाटकात मिळतील.माधवी गोगटे यांची ज्योती ची भूमिकाअक्षय केळकर यांची समीरची भूमिकातसेच मधुरा देशपांडेची गुणप्रिया ह्या भूमिका त्यांनी खूप छान रंगवल्या आहेतपण शेवटी संतोष पवार ची खराडे ची भूमिका हि धमाल उडवून देतेविनोदाचे टायमिंगसंवादफेकआणि भूमिकेला साजेशी असलेली देहबोली लक्षांत रहाते.

एकूण काय तर अंदाज आपला आपला म्हणजे मनोरंजन आपले आपले ,,,,,

दीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी ९९३०११२९९७

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here