जत धावले जत मॅराथॉन उत्साहात संपन्न ; भारत नरळे,राणी मुंचडी प्रथम क्रंमाकाने विजयी

0

जत,प्रतिनिधी : जगत् गुरू स्वामी विवेकांनद जंयती प्रित्यर्थ विवेक-बसव प्रतिष्ठान,जत आयोजित पहिल्या “जत मॅराथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.थोरल्या वेशीपासून आयोजित या उपक्रमात सहभागी होताना जतकरांमध्ये उत्साह जाणवत होता. नामांकित डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते,समाजसेवक,विविध ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांनीही सहभागी होत धावपटूंना प्रोत्साहित केले. ढगाळ वातावरण, गुलाबी थंडीत “जत मॅराथॉन ‘मध्ये धावत जतकरांनी सामाजिक बांधिलकी जपली. सुमारे 200,पुरूष व 150 महिलांनी सहभाग घेतला.पुरूष, महिल्याचे स्वतंत्र गट ठेवण्यात आले होते. पाच किलोमीटर अंतराची हि मॅराथॉन स्पर्धा होती. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व स्पर्धकांना टी शर्ट देण्यात आले होते. सकाळी सात वाजता माजी प्राचार्य पोतनिस सर यांनी लाल झेंडा फडकावून पुरूषाच्या स्पर्धेस सुरूवात केली. बोरबोर दहा मिनिटांनी योगशिक्षिका अनुराधा संकपाळ यांनी महिलाच्या गटास झेंडा फडकावून सुरूवात केली. सुसज्ज पोलिस बंदोबस्तामुळे वाहतूकीची अडचण झाली नाही.स्पर्धे दरम्यान पिण्यासाठी पाणी,केळी,ओआरए आदि साहित्य ठेवण्यात आले होते. स्पर्धेत पुरूष पाच व महिला पाच अशी बक्षिसे काढण्यात आली. पुरूषात प्रथम भारत नरळे(15मिनिटे,4 सेंकद),द्वितीय नवनाथ करांडे(16 मिनिटे 45 सेंकद), तृत्तीय समाधान नरळे(18 मिनिटे,51सेंकद),चौथे दशरथ मुकटे(16 मिनिटे,58सेंकद)पाचवे रविराज कोंडिगिरे(17मिनिटे,5सेंकद)बक्षिसे मिळविली.  महिलात प्रथम राणी मुंचडी(20मिनिटे,24 सेंकद),द्वितीय स्नेेेेहल घेरडे(20 मिनिटे 32 सेंकद), तृत्तीय कोमल कुलाळ(21 मिनिटे,24सेंकद),चौथे मेघाश्री बिराजदार(21 मिनिटे,40सेंकद)पाचवे प्राजक्ता टेंगले(21मिनिटे,43सेंकद)

औपचारीक शुभारंभाप्रसंगी डॉ. शालिवहन पट्टणशेट्टी,डॉ. सरिता पट्टनशेट्टी,डॉ. मल्लिकार्जून काळगी,डॉ. सोनाली काळगी, डॉ. शेख हिट्टी,डॉ. शिवमाला हिट्टी,डॉ. शंकर तंगडी, डॉ. भारत हेसी,डॉ. राजाराम गुरूव,डॉ. विवेकांनद राऊत,जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी अक्की यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.तालुक्याचे नाव उंचावणाऱ्या चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये कमालीची उर्जा बघायला मिळत होती. दोन गटात मँराथॉन आयोजित केला होता. पोलिस निरिक्षक गजानन कांबळे यांच्या हस्ते भव्य कार्यक्रमात विजयी स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले.

Rate Card

विवेक-बसव प्रतिष्ठान,जत आयोजित पहिल्या “जत मॅराथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विजयी स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.