मोहन माळी इंटरनॅशल स्कूलमध्ये पारपांरिक पध्दतीने संक्रात सण साजरा
अलकुड एस : येथील

मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल मध्ये पारपांरिक संक्रांत उत्साहत साजरी करण्यात आली. महाराष्ट्रातील महत्वाचा सण म्हणून सक्रांतीला मोठे महत्व आहे. देशभर हा सण उत्साहात साजरा केला जातो.नाविण्याची कास धरलेल्या जिल्ह्यात अल्पावधीत शिक्षण क्षेत्रात नावारूपास आलेले. व जत कवटेमहाकांळ तालुक्यात शैक्षणिक क्रांती घडविणाऱ्या मोहन माळी इंटरनॅशल स्कूलमध्ये शिक्षणाबरोबर देश,राज्यातील पारपांरिक सण,उत्सवाचे आयोजन केले जाते. बाल वयापासून या सणाविषयी मुंलाना माहिती मिळावी यासाठी स्कूलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यात मुलांना सर्वच पातळीवर सक्षम करण्याचा आमचा सतत संकल्प आहे.असे यावेळी संस्थापक मोहन माळी यांनी सांगितले.
स्कूल मध्ये वेगवेगळ्या राज्यातील शिक्षक काम करतात.पंजाबमध्ये संक्रांतीस लोहरी,केरळ मध्ये पोंगल म्हंटले जाते,त्या त्या राज्यातील पारपारिंक पद्धतीनुसार स्कूल मध्ये सण साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेच्या प्रांगणात पतंग उडवण्यात आले.शाळेतील मुंलाना विविध राज्यातील संक्रात सणाची माहिती देण्यात आली.
