हेल्थ पॉईट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला डॉ. संपत शिवणगी यांची सदिच्छा भेट

0

Rate Card

हेल्थ पॉईट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला डॉ. संपत शिवणगी यांची सदिच्छा भेट

सांगली : अमेरिकेतील मिसिसिपी राज्याचे मेडिकल बोर्डाचे चेअरमन व पद्यश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. संपत शिवणगी यांनी हेल्थ पॉईट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली.डॉ. शिवणगी यांचे स्वागत जतचे प्रसिध्द स्ञीरोग डॉ.रविंद्र आरळी यांनी केले.याप्रसंगी हेल्थ पॉईटचे डायरेक्टर डॉ. रविंद्र आरळी,प्रसाद जगताप,डॉ. शरद सांवत,सम्राट माने उपस्थित होते.भेटीप्रंसगी बोलताना ते म्हणाले,हेल्थ पाँईट लोकांच्या आरोग्य सेवेसाठी उत्तम सोय झाली आहे. अगदी अल्प कालवधीत नावारूपास आले आहे. अत्याधुनिक उपकरणे,सेवा,सुविधा, डॉक्टर्स, स्पाफबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.येथे शासनाच्या आरोग्य योजनेतून ह्रदय शस्ञक्रिया,अंन्जोओप्लाटी,किडनी,हाडाच्या शस्ञक्रिया,प्लॉस्टिक सर्जरी,स्ञीरोग,दंतरोग,कान,नाक,घशावरील उपचार मोफत केले जातात. भारतात माता मृत्यू प्रमाण अधिक आहे. ते कमी होण्यासाठी डॉक्टर्स व शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे,असे सांगितले. ते म्हणाले अमेरिके सारख्या प्रगत देशामध्ये सर्व नागरिक व डॉक्टरांना आरोग्य विमा घेणे बंधनकारक होणे गरजेचे आहे. तसेच तो भारतातही बंधनकारक होणे गरजेचे आहे. डॉक्टर्स व स्टॉप उपस्थित होते.आभार प्रसाद जगताप यांनी मानले.

हेल्थ पॉईट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला डॉ. संपत शिवणगी यांची सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार करताना डॉ. रविंद्र आरळी,प्रसाद जगताप,डॉ. शरद सांवत,सम्राट माने आदि.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.