मनरेगाची सिआयडीमार्फत चौकशी करा राष्ट्रवादीची मागणी : घोटाळ्यात आ. विलासराव जगताप मास्टरमांईड

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मनरेगा घोटाळ्यात आमदार विलासराव जगतापच गुंतले आहेत. त्यांच्या घोटाळे बहादारांना पांठिबा होता. मनरेगा घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेल्या एका अधिकाऱ्यांचा जंगी सत्कार आमदार जगताप यांच़्या हस्ते करण्यात आला होता. त्याला चारचाकी गाडी,सोने,किंमती वस्तू भेट देण्यात आल्या होत्या.मनरेगात सुमारे 40 कोटीचा घोटाळा झाली आहे. त्यांची सिआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी रेवऩाळ सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र वाघमाडे व राष्ट्रवादी नेत्यांनी पत्रकार बैठकीत केली.यावेळी श्री. वाघमोडे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, नगरसेवक टिमू एडके, उत्तम चव्हाण, प्रा. हेमंत चौगुले, बाजी केंगार आदी उपस्थित होते. वाघमोडे म्हणाले, आता पर्यत तालुक्याच्या इतिहासात कधीही असे सत्कार झाले नव्हते. त्यामुळे सत्कारासाठी पैसा आणला कोठून हा संशोधनाचा विषय आहे.विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना आमदार जगताप हे अधिवेशनाला गेले नाहीत. मनरेगाची बिले काढण्यासाठी ते खटाटोप करत आहे. त्यासाठी पंचायत समितीत तळ ठोकून आहेत.तालुक्यात मनरेगातील मजूरांची कामे जेसीबीने केली आहेत. नुसत्या कागदपत्री मजूरांच्या याद्या जोडून पैसे काढण्यात आले आहेत. यातिल पुर्ण सत्य बाहेर काढण्यासाठी सर्व कामाची सिआयडीमार्फत चौकशी करावी. भाजपचेच अनेकजण ठेकेदार आहेत. त्यांनी सनमडी, मायथळ, रामपूर,को. बोबलाद,मोटेवाडी,तिंकोडी,गिरगाव,पांढरेवाडी,या गावात मनरेगातील कोट्यावधीची बोगस कामे केली आहेत. त्यांच्या विरोधात तक्रारीही दाखल झाल्या आहेत. हे सर्व आमदाराचे बगबच्चे आहेत.अनेक गावातील कामाच्या चौकशा सुरू आहेत. एडके म्हणाले,आमदार जगताप व जमदाडे यांनी किती पक्ष बदलले हे जगजाहीर आहे.प्रत्येक निवडणूकीत नविन पक्षात जाऊन सत्ता मिळविण्यासाठी त्यांचा  सतत प्रयत्न असतो. गेलेल्या पक्षावरही त्यांचा विश्वास नाही. सतत पक्षविरोधी भुमिका घेत आहेत. आज त्यांची भाजपात काय आवस्था आहे हे वेगळे सांगायची गरज नसल्याची एकडे यांनी सांगितले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.