मनरेगाची कामे अडवून तालुक्याच्या 25 कोटीच्या विकास निधीचे नुकसान सरदार पाटील, तम्माणगौंडा रवी याचे आरोप ; आ. विलासराव जगताप यांच़्यावर बिनबुडाचे आरोप

0

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वरदान ठरणाऱ्या मनरेगा योजनेला बदनाम करणाऱ्या सुरेश शिंदे यांनी कोणते चांगले काम केले आहे. हे सिध्द करावे जत ग्रामपंचायत, पालिकेच्या सत्तेचा पैसे मिळविण्यासाठी वापर करून पैसे मिळवलेत. त्यांनी आमदार विलासराव जगताप यांच़्या वर आरोप करू नयेत.अशी टिका जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील व तम्माणगौंडा रवी यांनी पत्रकार बैठकीत केली.

Rate Card

जत तालुक्यासाठी मनरेगातून वर्षाला सुमारे पंचवीस कोटीचा निधी येतो. त्यातून तालुक्यातील मोठी विकास कामे करता येतात. मात्र अशा आरोपांनी योजनेच्या कामांना खो घालून तालुक्याचे नुकसान करण्याचा उद्योग बंद करावा.मनरेगातील भष्ट्राचार केलेल्यावर कारवाई झाली आहे. त्यांच्या चुकीमुळे तालुक्यात रोजगार हमीतून वर्षभरात एकही काम झाले नाही.त्यात नुकसान तालुक्याचे झाले आहे. विकास कामाला खिळ घालण्याचा हा प्रकार आहे.ज्यांनी भष्ट्राचार केला त्यांच्यावर कसेस झाल्या आहेत. त्यांच्यासाठी विद्यायक कामे अडविण्याची प्रवृत्ती चुकीचे आहे. मुळात भष्ट्राचार केलेल्यावर केसेस झाल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे शिंदे यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी मनरेगातील कामाबाबत व़्यवस्थित माहिती घेऊन बोलावे. मुळात ज्यांची कामे बोगस झाली आहे.त्यांच्या वर कारवाई होईल. मात्र अशा काही लोकामुळे तालुक्याचा विकास निधी रोकून मोठे नुकसान केले जात आहे. जी कामे चांगली,नियमाप्रमाणे झाली आहेत. त्यांची बिले द्यावीत असे आमदार विलासराव जगताप यांचे म्हणणे आहे. बोगस कामाचा किंवा भष्ट्राचाराचा संबंध येतोच कुठे,आमदार म्हणून तालुक्यातील विकास कामे व्हावीत यासाठी आमदार साहेब प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर आरोप करून शिंदे काय साध्य करणार आहेत. मुळात सत्तेसाठी सतत पक्ष बदलणाऱ्यांनी कुणावरही आरोप करू नयेत. मनरेगात कुणी भष्ट्राचार केला यांची चौकशी चालू आहे. त्यातून सत्य बाहेर येईल. मात्र विकास कामात अडवे येऊन तालुक्याचील जनतेचे नुकसान करून नये असेही शेवटी पाटील,रवी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.