डॉ. रविंद्र आरळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वैद्यकीय व़्यवसायातील “देव माणूस”डॉ. रविंद्र आरळी यांच्या आज होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शहरात आरळी नावाला वलयं मिळवून वेगळपण जपणारे डॉ.आरळीचा तालुकाभर बोलबाल होत आहे. अगदी शांत, सयंमी,भविष्यातील योजना आखत विचारपुर्वक सर्व पातळीवर काम करणारे,महिला रुग्णांना वरदान ठरलेले डॉ. आरळी यांनी जत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्र आजमाअामर केले आहे. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभा करत त्यांनी सर्व वैद्यकीय सुविधा एका छताखाली आणल्या आहेत. शहरात शैक्षणिक संकुल,विविध कोर्ससेस,इग्लिंश मिडियम स्कूल, आर्युवैदीक हॉस्पिटल,उमा नर्सिंग होम अशी हॉस्पिटल सुरब करून त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे.तीन तपाहून जास्त काळ भाजपमधून सक्रीय असणाऱ्या डॉ. आरळी यांनी राजकीय क्षेत्रातही दमदार पाऊल टाकले आहे. त्यांचा आज वाढदिवस संपन्न होत आहे. शहरातील त्यांची हॉस्पिटले,कॉलेज,स्कूलकडून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डॉ. आरळी सायकांळी त्यांच्या हॉटेल ई-स्वेअर येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत. तेथे वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होणार आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.