मनरेगा घोटाळ्यात सोनेरी टोळीचा कोट्यावधीच्या निधीवर डल्ला सुरेश शिंदे यांची टीका : बिले काढण्यासाठी आमदारांकडून अधिकाऱ्यांवर दबाव
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात झालेल्या मनरेगा घोटाळ्यामागे आमदार विलासराव जगताप यांच़्या सोनेरी टोळीचा हात आहे. त्यांनी केलेल्या बोगस व दर्जाहीन कामाची सात कोटीची बिले अडकली आहेत.आपल्या बगबच्चांना थकलेले बिलाचे पैसे मिळावेत म्हणून आमदाराला आपली पातळी ओलांडून पंचायत समितीला टाळे ठोकण्याची भाषा करावी लागत आहे. प्रत्यक्षात हि बिले मिळावीत म्हणून आमदार अधिकाऱ्यांवर दबाबव टाकत आहेत. त्यांना आपली पातळी सोडून टाळे टोकणे,उपोषण करणे हे भाषा सोभत नाही. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केली.
आमदार विलासराव जगताप यांनी मनरेगाची कामे तातडीने सुरू करावीत म्हणून अंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पाश्वभुमीवर हि पत्रकार बैठक घेण्यात आली.यावेळी उपसभापती शिंदे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, उत्तम चव्हाण,बाजी केंगार उपस्थित होते. पंचायत समितीची सत्ता शिंदे गटाच्या पांठिब़्यावर आहे. त्यामुळे पंचायत समितीत सुरेश शिंदे गटाचे किंबहुना राष्ट्रवादीचे शिवाजी शिंदे उपसभापती आहेत. आमदार विलासराव जगताप यांच़्या इशाऱ्यावर शिंदे यांनीही घणाघाती टिका केली. शिंदे म्हणाले,आमदारांना कार्यालय,गाडी,स्विय सहाय्यक यांच्यासाठी शासन भत्ता देते. असे असतानाही आमदार नेहमी पंचायत समितीत तळ ठोकून असतात. ते पंचायत समितीत बसत असताना गेल्या टर्ममध्ये मनरेगा मोठा घोटाळा झाला. घोटाळे बहादारांचा वावर त्यावेळी कायम असायचा,त्यामुळे आमदार उपस्थित असतानाही त्यांना इतका मोठा घोटाळा कोणाच्या मदतीने झाला. घोटाळ्याचा सुत्रधार कोण हेही आमदारांनी जाहीर करावे.मनरेगा मजूरांच्या हाताला काम मिळावे म्हणून योजना आहे. मात्र ठेकेदारांनी बोगस मजूर दाखवून कोट्यावधीच्या निधीवर डल्ला मारला आहे.मजूरांची कागदपत्रे दाखवत जेसीबीने कामे केली. अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिले काढली. जुने बांध माती टाकून नव्याने दाखविले.अशा बोगस कामाची सात कोटीची बिले अडकली आहेत. एकही काम नियमाप्रमाणे नाही,कागद नाहीत. अनेक कामेच नाहीत.अशी परिस्थिती आहे.शासनाने या कांमाची तपासणी करण्यासाठी पाच बिडिओ व 30 कर्मचाऱ्यांची पथक नेमले आहे. मात्र प्रंचड बोगस कामामुळे पथकाने अद्याप अहवाल दिली नाही.या थकित बिलात सोनेरी टोळीचीच बिले अडकली आहेत. शिंदे म्हणाले, एकही शेतकरी,

ग्रामपंचायत व मजूर बिलासाठी पुढे येत नाहीत. बोगस बिले देण्यास विरोध करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांला टार्गेट करण्यात येत आहे. त्यांच्या दबाव टाकत,शिवीगाळ केली जाते.अधिकारी,कर्मचाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार घडत आहेत. या सोनेरी टोळीमुळे अनेक अधिकारी,कर्मचाऱ्यांना जेलमध्ये जावे लागले आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे. सोनेरी टोळीतील ठेकेदारांनी खरे मजूर सोडून आपल्या मर्जीतील अधिकारी,कर्मचारी,सैन्यदलातील जवान,दवान्यात कामाला असलेल्या परिचारिका,पुणे,मुंबई, महाराष्ट्राबाहेर कामाला असलेल्या लोकांच्या नावाने जॉबकार्ड काढली आहेत. मजूर म्हणून खोट्या हजेरी दाखविल्या आहेत.त्यांच्या खात्यावर जमा पैसे,एटीएम मधून काढले आहेत. मनरेगा तून झालेल्या 250 गोठ्याची तपासणी झाली आहे. त्यातिल एकही काम एमबी प्रमाणे झाले नसल्याचे उघडीस आले आहे. अनेक कामे बोगस आहेत. त्यामुळे अशा बोगस कामाची बिले काढण्यासाठी आमदार अंदोलन करत आहेत. ते कितपत योग्य आहे. मनरेगाची सर्व कामाची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी करावी,दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केली.
