प्रभाकर जाधव दापत्यांकडून पत्रकारांचा पत्रकारदिनीं सन्मान
जत,प्रतिनिधी : सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अॅड. प्रभाकर जाधव व जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव यांच्या हस्ते डायरी,पेन शाल,श्रीफळ,फुल पोषाक,पत्नीसाठी साडी असा अगळावेगळा सन्मान करण्यात आला.
पत्रकार म्हणून काम करत असताना जनहितासाठी प्रयत्न करत असणाऱ्या पत्रकारांचा गौरव करणे महत्वपुर्ण आहे. जतच्या पत्रकारांचे जतच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. जनतेचे प्रश्न तळमळीने मांडून त्यांना न्याय देण्याचे पत्रकारांनी केले आहे. त्यामुळे जतचा नावलौकिक राज्यभर होत आहे. त्यांच्या आम्ही गौरव करून त्यांच्या लेखणीला ताकत देण्याचा प्रयत्न केला आहे. असे गौरद्वार यावेळी जाधव यांनी काढले. जत शहरातील सर्व पत्रकारांना सत्कार जाधव दापत्यांकडून करण्यात आला.यावेळी सर्वच पत्रकारांनी कृत्रज्ञता व्यक्त केली.

जत : अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अॅड. प्रभाकर जाधव व जि.प सदस्या स्नेहलता जाधव दापत्यांकडून दैनिंक संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी यांचा सत्कार करण्यात आला.
