संपादक शंकर चव्हाण कै. धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

0

अंबाजोगाई पत्रकार संघाचे दपर्ण दिनानमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

अंबाजोगाई | प्रतिनिधी :

Rate Card

दर्पण दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने जयवंती टाईम्सचे संपादक शंकर चव्हाण यांना दर्पण दिनानिमित्त कै. धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चला पत्रकारितेवर बोलू काही ! व कोस कोस चालतो वारकरी अन् विठ्ठलाचे पहिले दर्शन घेतात मुख्यमंत्री ! या दोन विषयातील स्पर्धेत पुरस्काराचे मानकरी संपादक शंकर चव्हाण हे ठरले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठे संपादक प्रा. नानसाहेब गाठाळ, प्रमुख आकर्षण व वक्ते मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, प्रमुख अतिथी नगराध्यक्षा रचनाताई मोदी, जेष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकेर्ते नंदकिशोर मुदंडा (काकाजी), पत्रकार संघाचे विश्वस्त पत्रकार रत्न पुरस्कारप्राप्त तथा साप्ताहिक सांजपाखरु चे संपादक अशोक (काका) गुंजाळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज लखेरा, सचिव विरेंद्र गुप्ता, अनिल महाजन, पत्रकार वाघमारे, मान्यवरांची विचारपीठावर उपस्थिती होती. बाळाशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्त दर्पणदिन कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करुन व मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापुजनाने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक सकाळचे पत्रकार शिवकुमार निर्मळे यांनी केले तर सुत्रसंचलन दैनिक बीड संकेतचे अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार विरेंद्र गुप्ता यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी एस.एम. देशमुख, नंदकिशोर मुंदडा, अशोक गुंजाळ, रचनाताई मोदी, यांनी आपले मनोगत व्यक्त करुन दर्पन दिनाच्या शुभेच्छा दिल्या, प्रा. नानसाहेब गाठार यांनी केला तर कार्यक्रमाचे आभार दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार रवी मठपती यांनी मानले. अंबाजोगाई पत्रकार संघाच्या दर्पण दिनानमित्त कार्यक्रमास व पुरस्कार वितरण समारंभास पंचक्रोशितील सामाजिक कार्यकर्ते, पुढारी, पत्रकार बांधव, संपादक बांधव, साहित्यीक तालुक्यातील अन्य नागरीकांची मोठी उपस्थिती होती. संपादक शंकर चव्हाण यांनी पुरस्काराला उत्तर देत अंबाजोगाई पत्रकार संघाचे व विश्वस्तांसह सदस्यांचे आभार मानले व पुढील काळात जबाबदारी वाढल्याचे सांगत जनतेसाठी, वंचितांसाठी लेखणीचा प्रामाणिक प्रयन्त करीन विश्वास दिला. याच पुरस्कार सोहळयात दै. लोकाशाचे अंबासाखर येथील पत्रकार सालम पठाण यांना कै. भिकाभाऊ राखे स्मृती पुरस्कार व पत्रकार संघ पत्रकारीता पुरस्काराने वैदकनी तालुका पाटोदा येथील दै झुंजार नेताचे पत्रकार श्रीरंग लांडगे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एकुणच दर्पण दिनानिमित्त पुरस्कार सोहळा हा भव्य दिव्य झाल्यामुळे सर्व स्तरांतुन पुरस्कार विजेते व पत्रकार संघाचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.