जत तालुक्यातील मनरेगा कामे सुरू करा,अन्यथा पंचायत समितीला ठाळे ठोकू आ. विलासराव जगताप ;बिडीओ टोणपेला निलबिंत करा

0

जत,प्रतिनिधी:जत तालुक्यातील मनरेगा कामे तातडीने सुरू करा, अन्यथा जत पंचायत समिती टाळे टाकू,उपोषणाही करू असा इशारा आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिला.कामे अडविणाऱ्यां अधिकाऱ्यावर निलबंनाची कारवाई करा,यापुर्वी जिल्हा नियोजन,पंचायत समिती स्तरावर आम्ही हा मुद्या मांडला आहे. तरीही एक वर्षापासून कामे सुरू नाहीत. त्यामुळे विकास कामांना मर्यादा पडल्या आहेत.  जतच्या विकासासाठी पंचवीस कोटीच्या विकास निधीवर अधिकाऱ्यांच्या दोन गटातील वादामुळे पाणी फिरवावे लागले आहे.यापुर्वी जी बोगस कामे झाली आहेत. त्यांच्यावर फौजदारी करा.त्यांच्या चुकीसाठी नविन कामे थांबू नयेत.यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. आमदार विलासराव जगताप म्हणाले,सांगली जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांत दोन गट पडले आहेत. त्यामुळे तेथे एकमेकाची कामे अडविण्याचे प्रकार होत आहेत. त्यांच्या पलिकडे जत पंचायत समितीचे बिडिओ निष्क्रिय आहेत. त्याच्यां व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसुळ यांच्या एकाधिकार शाहीमुळे ग्रामसेवक गेल्या महिऩ्याभर संपावर आहेत. त्यामुळे जत तालुक्यातील ग्रामपंचायतीची कामे रखडली आहेत.दुसरीकडे अडसुळ व जत पंचायत समितीचे बिडिओ मिलिंद टोणपे यांच्यात वाद आहे. त्यामुळे जत तालुक्यात कामे झालेल्या कुशल,अकुशल कामाची सुमारे सात कोटीच्या कामाची बिले अडकली आहेत. दोन्ही अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांची कामे व़्यवस्थित झाली आहेत,त्यांची बिले थांबविली आहेत. ज्या कामात बोगसगिरी झाली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा,पंरतू बाकीचे बिले तातडीने द्यावीत. प्रत्येक कामात अधिकाऱ्यांना वरकमाई पाहिजे आहे. त्यामुळे चालढकल केली जात असल्याचा आरोप आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी केला.आता आम्ही निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमच्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनाही आक्रमक होण्याच्या सुचना दिल्या आहेत.महात्मा गांधी रोजगार योजनेची कामे सुरू करा. जतच्या विकासावर होणारा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. अन्यथा तालुक्यातील जनतेसह रस्त्यावर उतरू असा अतिंम इशारा आ. जगताप यांनी यावेळी दिला. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील उपस्थित होते.

Rate Card
  • जत पंचायत समितीच्या सभापतीच्या काम करण्याच्या पध्दतीवरही आ. जगताप यांनी आक्षेप घेतला. खरे वास्तविक पंचायत समिती स्तरावर काय काय कामकाम चालते.जनतेची कामे का? अडली जातात. अधिकारी व़्यवस्थित काम करतात का? याबाबत सभापती कडून नित्याचा पाठपुरवा गरजेचा आहे.तसा होत नसल्याची खंत आ. जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. प्रत्यक्षात विकास कामांना गती आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक प्रयत्न करण्याची गरज आहे.असेही आ. जगताप यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.