व्हसपेठ डोंगर ते उमदी महाराष्ट्र हद्द रस्ता कामासाठी साडेसोळा कोटीचा निधी

0

  आ. विलासराव जगताप

Rate Card

  • जत,प्रतिनिधी : जत तालुक्याचा कायापालट करण्याचे वृत्त स्विकारलेल्या आमदार विलासराव जगताप यांच़्या प्रयत्नातून जत तालुक्यातील रस्ते सुसज्ज करण्याचे गतीने प्रयत्न सुरू आहेत. त्यांचाच भाग म्हणून तालुक्यातील महत्वाचा असणाऱ्या जत-चडचडण रोडवरच्या व्हसपेठ डोंगर ते माडग्याळ, सोन्याळ फाटा,उटगी,उमदी ते कर्नाटक हद्द पर्यतच्या 42 किलोमीटर रस्ता आता महामार्ग होत आहे.या रस्ता दुरूस्थीसाठी महाराष्ट्र शासनाकडून साडेसोळा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या मार्गावर चकचकीत सतरा फुट रुंद होणार आहे. त्यामुळे सततच्या अरुंद खड्डेयुक्त रस्त्याने वैतागलेल्या या परिसरातील वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे. देश स्वांतत्र झाल्यापासून या रस्ताच्या अपेक्षित विकास झाला नाही. त्यामुळे दोन राज्यांना व तालुक्यातील पुर्व भागातील सुमारे पंचवीस गावाचा दळवळणाचा हा मार्ग दुर्लक्षित राहिला.परिणामी अल्प दुरूस्थीमुळे मार्गाची अरुंद व खड्डेयुक्त राहिला आहे. या मार्गावरून दोन वाहने एकाचवेळी जाऊ शकत नव्हती अशी स्थिती होती. मात्र आमदार विलासराव जगताप यांच्या विकासाच्या धोरणातून हा मार्ग आता नव्याने आकारास येणार आहे. त्यासाठीचा निधी उपलब्धं झाला असून लवकरच टेंडर प्रक्रिया होऊन कामास सुरूवात होणार असल्याचे आ. जगताप यांच़्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान गुहागर-विजापुर महामार्ग नंतर हा दुसरा मोठा रस्ता होत आहे. विकासाची कास धरलेल्या आ. जगताप यांनी सरकारकडे सतत पाठपुरवा करत आतापर्यत सुमारे 1000 कोटीचा विकास निधी आणला आहे. त्यातिल कामे गतीने सुरू असल्याचे आ. जगताप यांच़्या कार्यालयाकडून कळविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.