भिमा कोरेगाव घटनेच्या निर्षेधार्थ उमदीत कडकडीत बंद
भिमा कोरेगाव घटनेच्या निर्षेधार्थ उमदीत कडकडीत बंद
विविध सामाजिक संघटनाचा पाठिंबा
उमदी,वार्ताहर:
भीमा-कोरेगाव दंगलीचे पडसाद सिमावर्ती भागातही उमटले. गुरूवारी उमदी (ता.जत) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.घटनेच्या निषेधार्थ युवकानी गावातून निषेध मोर्चा काढला व शांततेने बंद पाळण्यात आला.

मोर्चा काढण्यासाठी दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष राहुल श्रीमक्कळ यांनी पूढाकार घेतला. या मोर्चात मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख निवृती शिंदे ,फिरोज मुल्ला, रमेश हळके, रवि शिवपूरे, जोतिबा शेवाळे,संगु ममदापुरे, सिध्दू बिरुनगी यांनी पाठीबा दिला. यल्लापा तोरणे,नारायण ऐवळे,महावीर अजमाने यांच्यासह अनेक कार्यकार्त्यानी गाव बंदचे आवाहन केले. दिवसभर गावकऱ्यांनी गाव बंद ठेवुन मोर्चास पाठिंबा दिला. तसेच उमदी परिसरातील नागरिकांनीही पाठिंबा जाहीर केला.उमदी-चड़चण रोडवरील डॉ. बाबासाहेब अंबेडकर चौकातून निषेध मोर्चास सुरुवात झाली. उमदी बसस्थानक वरती जाऊन मोर्चाचे रुपातंर सभेत झाले. यांवेळी निवृत्ती शिंदे,राहुल श्रीमक्कळ,रमेश हळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
बंद शांततेत व यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल ग्रामस्थ व आंदोलकांचे आभार दलित महासंघाकडुन मानले.
भिमा कोरेगाव घटनेच्या निर्षेधार्थ उमदीत कडकडीत बंद पाळण्यात आला. गावबंद ठेवण्यात आले.दंगलखोरावर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
