श्रमसंस्कार शिबिर काळाची गरज : डिवायएसपी नागनाथ वाकुडे

0

उमदी,वार्ताहर:विद्यार्थ्यानी अंगाशी जिद्द बाळगावी व आपल्या समोर उभे असलेल्या संकटा वरती मात करुन शारऱिक व बौध्दीक श्रम करण्याची ताकद मनाशी बाळगावी.तरचं स्वयंपुर्ण होत येत,असे प्रतिपादन डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे यांनी केले. ते उमदी येथील कार्यक्रमात बोलत होते.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर अंतर्गत सर्वोदय शिक्षण संस्था उमदी संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या वतिने बालगांव ता जत येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्धाटन समारंभ बुधवारी 4 रोजी जत उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुर्डे यांच्या हस्ते संपन्न झाले.

      राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिरासाठी दररोज गावातील स्वच्छता करणे,स्वच्छतेचे संदेश देणे व्याख्यान कार्यक्रम व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम दि 4  ते 10 जानेवारी पर्यन्त चालणार आहे.यावेळी गुरुदेव आश्रम बालगांवचे मठाधिपती श्री अमृता नंद स्वामीजी, सी.आर. होर्तिकर, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक भगवान शिंदे,सरपंच सौ संगीता बगली उपसरपंच ईराण्णा सारवाड माजी जि. प.सदस्य शावरसिध्द दुधगी,सायबण्णा मुचंडी बादशहा नदाफ, माजी ग्रा पं सदस्य संजय कांबळे, भीमाशंकर भंडारकवटे,जि. प. शाळा बालगांव मुख्याध्यापक शेट्याप्पा कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते.

Rate Card

  स्वागत व प्रास्ताविकात प्राचार्या डॉ.सौ. एस पी होर्तिकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे महत्व ,उद्दीष्टे गरज स्पष्ट केले सुत्रसंचलन प्रा.महाडिक सर तर आभार कोटगोंडे सर यांनी मानले.

फोटो

उमदी ता.जत येथील सर्वोदय शिक्षण संस्था उमदी संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या श्रमसंस्कार शिबिरात बोलताना डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे बाजूस उपस्थित मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.