राष्ट्रवादीचे आप्पासाहेब पवार उपनगराध्यक्ष अखेर राष्ट्रवादी-कॉग्रेसची आघाडी :राष्ट्रवादीचे स्वप्निल शिंदे,कॉग्रेसचे इकबाल गंवडी गटनेते

0

जत,प्रतिनिधी : अखेरपर्यत निश्चित नसलेल्या व जतकरांची उत्सुक्ता सिंगेला पोहचलेल्या जत नगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला. टोकाचा विरोध माळवला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे व कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या समेट घडला आहे.पालिकेत कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाल्याने राष्ट्रवादीचे आप्पासाहेब दुर्गाप्पा पवार यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवडी झाली. राष्ट्रवादीचे गटनेते स्वप्निल शिंदे, तर कॉग्रेसचे गटनेते म्हणून इकबाल गंवडी यांची निवड झाली. तर भाजपने गटनेता निवडीसाठी पत्र दिले नसल्याने त्याची गटनेता निवड लांबणीवर टाकण्यात आली आहे.कॉग्रेसचे निलेश बामणे स्विकृत्त नगरसेवकपदी निवड झाली.

उपनगराध्यक्ष, गटनेते व स्विकृत्त सदस्य निवडीसाठी नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनावर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली होती. यावेळी मुख्याधिकारी हेंमत निकम उपस्थित होते.

अखेरपर्यत संस्पेश कायम असलेल्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी आप्पासाहेब पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाहिर करण्यात आली. यावेळी कॉग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.

Rate Card

निवडीनंतर पवार यांचे राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, माजी सभापती मन्सूर खतीब यांनी पुष्पहार घालून अभिंनदन केले. यावेळी नगरसेवक टिमू एडके,स्वप्निल शिंदे,उत्तम चव्हाण, बाजी केंगार उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोष करण्यात आला. शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

महिना भरापुर्वी चुरसीने झालेल्या जत पालिकेच्या निवडणूकीत कोणाला बहुमत मिळाले नाही. भाजपा 7,राष्ट्रवादी, कॉग्रेस प्रत्येकी 6,व बसपला एक जागा मिळाली आहे. कॉग्रेसच्या शुंभागी बन्नेनावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही दोन पक्षांना एकत्र येण्याशिवाय गंत्यतर नव्हते.निकालापासून आघाडी बाबत चर्चेला उधान आले होते.भाजपकडून मोर्चेबांधणी केली होती.मात्र सर्वाधिक जागा मिळूनही ऐनवेळी कॉग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याने भाजपला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.देशातील परिस्थिती नुसार कॉग्रेस-राष्ट्रवादीचे समेट घडल्याने कॉग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम व राष्ट्रवादीचे नेते आमदार जंयत पाटील यांनी आघाडीचे संकेत दिले होते. भाजपशी युती न करण्याचे आदेश होते. त्यामुळे टोकाचा संघर्ष असलेले स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, कॉग्रेसचे नेते विक्रम सांवत यांनीही आपले वैरत्व बाजूला ठेवत समझोता केला. कॉग्रेसच्या बंडखोराचे कान टोचले. त्यामुळे शहराच्या सर्वागिंन विकासासाठी कॉग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.निवडीनंतर राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे म्हणाले,पालिकेत कॉग्रेस सोबत आघाडी करण्याचा निर्णय आमचे नेते जंयत पाटील यांनी दिला होता. त्यामुळे कॉग्रेसशी आघाडी केली आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जतच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू.दरम्यान भाजपकडून गटनेते पदासाठी पत्र न आल्याने त्यांच्या निवडी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. भाजपच्या कोट्यातील स्विकृत्त नगरसेवकही होऊ शकला नाही त्यामुळे तर्कविर्क लावले जात आहेत.

 

राष्ट्रवादीचे नेते स्वप्निल शिंदे
पालिकेत राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून युवा नगरसेवक स्वप्निल शिंदे यांची निवड करण्यात आली. अगदी लहान वयात नगरसेवक म्हणून निवडून आलेले स्वप्निल यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. सर्वाचा विश्वास सार्थ ठरवू व जतच्या विकासासाठी अग्रक्रंमाने माझे काम राहिल असे शिंदे यांनी निवडीनंतर सांगितले. (चौकटीला स्वप्निल शिंदेचा फोटो वापरा)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.