सोरडी येथील समाधगिरीजी महाराज यांच्या 75 व्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

जत,वार्ताहर: श्री.महंत समर्थ समाधगिरीजी महाराज यांच्या 75 वी पुण्यतिथी निमित्ताने श्री.दत्तात्रयदेव सोमगिरी गुरू समाधगिरीजी महाराज ट्रस्ट, (सोरडी,ता-जत) यांच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध कार्यक्रमाचे संपन्न होणार आहेत.शुक्रवार दि 29 रोजी ह.भ.प. माधव साळे महाराज (निगडी खुर्द) यांचे प्रवचन तसेच संध्याकाळी ह.भ.प. रामजी महाराज (टोणेवाडी) व ह.भ.प. जयाप्पा महाराज गोंधळेवाडी यांचे किर्तन झाले. शनिवार ह.भ.प. रखमाजी चाबरे महाराज (सोरडी) यांचे प्रवचन व सायंकाळी श्री. महंत कैलास गिरजी महाराज (सोरडी) यांचे किर्तन झाले.तसेच रविवारी ह.भ.प.रघुनाथ महाराज जंगली डोंगर, ह.भ.प. शंकर काळे महाराज सोरडी , ह.भ.प. यांचे किर्तन प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आज सोमवारी ह.भ.प. वसंत काटे महाराज (जवळा) , ह.भ.प. लिंगण्णा महाराज (कोळगिरी) यांचे प्रवचन व किर्तन आहे. मंगळवार दि 02 डिसेंबरला सकाळी 10 ते 5 पर्यंत जंगी भारूडाचा कार्यक्रम,सकाळी 9 ते 5 पर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महंत आनंदगिरजी महाराज (मठाधिपती सोरडी), ह.भ.प. मच्छिंद्र महाराज (वाटंबर) व ह.भ.प. गोविंद भोसले महाराज (मारोळे आश्रम) हे किर्तन व प्रवचनातून समाजाला मार्गदर्शन करतील. 

बुधवार दिनांक 03 डिंसेबर रोजी श्री. समर्थ समाधगिरजी महाराजांच्या समाधीवर अभिषेक व मंत्रपुष्पांजली होणार आहे. तरी सर्व भक्तांनी या सप्ताहात कार्यक्रमास येऊन लाभ घ्यावा व पुण्य संपादन करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.कार्यक्रमास महामंडलेश्वर श्रीश्री 1008 श्रीस्वामी सुरेंद्रगिरजी महाराज व त्यांचा संपूर्ण शिष्य परिवार स्वागतास व मार्गदर्शनास उपस्थित आहेत. आ. विलासरावजी जगताप, माजी सभापती सुरेश शिंदे (सरकार), कॉग्रेस नेते विक्रमसिंह सावंत,माजी आमदार प्रकाश शेंडगे,शार्दूलराजे डफळे,आप्पासो बिराजदार,रमेश पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळे संगीतासाठी योगदान देत आहेत.

Rate Card

सप्ताह कमिटी व श्री महंत आनंद गिरीजी गुरू सुरेंद्रगिरीजी महाराज यांच्याकडून सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळे, तरूण मंडळे आजी माजी सैनिक यांचे बहुमोल योगदान या सप्ताहासाठी मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.