जत-सांगली मार्गावर अपघात : एक ठार,एक गंभीर

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत -सांगली रोडवरील चौथा मैल नजिक डस्टर व मारूती अल्टो वाहनाच्या धडकेत एकजण ठार झाला.अन्यपैैैंकी एक गंभीर जखमी झाला तर 6 जण जखमी झाले आहेत.त्यात दोन महिलाचा सहभाग आहे. घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.  उपचार सुरू असताना जखमी राजशेखर महालिंगप्पा कतकले वय-55,

रा. कोल्हापूर मुत्यू झाल्याचे रात्री उशिराने समजले,तर हिंमाशू देवरा शुक्ला(वय-25,रा.सांगली), असे गंभीर जखमीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जत येथील अजित बाबाजी नदाफ यांचे कुंटुबिय डस्टर गाडीतून सांगलीकडे चालले होते.त्यांच्या डस्टर व सांगलीकडून येणारी मारुती अल्टो गाडीची समोरासमोर धडक झाली. दोन्ही गाडीचा चक्काचुर झाला आहे. अपघातात डस्टर गाडीतील अजित बाबाजी नदाफ (वय-45),आसिफ अन्वर शेख,अखत्तर अन्वर शेख(वय-30),यासमिन मुबारक पिंजारी(वय-30),नजरा अन्वर शेख (वय-45)सर्वजण रा.जत तर मारूती अल्टोतील  संजय भानू शेळके(वय-30,रा. कोल्हापूर हे जखमी झाले आहेत.

जखमीवर मिरज येथे उपचार सुरू आहेत. अधिक तपास राजू कांबळे करत आहेत.

फोटो

जत-सांगली मार्गावर चौथा मैल येथे अपघातात चक्काचुर झालेली वाहने

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.