पदासाठी इच्छूकांची घालमेल जत नगरपालिका : सत्ता स्थापनेच्या मोर्चेबांधणीला वेग; मात्र गुंता कायम
जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूक होऊन पंधवडा उलटला आहे.त्रिशंकू स्थितीने सत्ता स्थापनेचे त्रांगडे कायम आहे. कॉग्रेस,राष्ट्रवादी युक्तीसाठी जिल्हा नेत्यांच्या आदेशावरून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. दुसरीकडे पदासाठी इच्छूकांची घालमेल सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणूकीत एकहाती सत्ता आणण्याचे सर्वोत्तपरी प्रयत्न करूनही कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. निवडणूकीत टोकाचा प्रचाराने रान उठविले असतानाही मतदारांनी तिन्ही पक्षांना समिश्र यश दिले आहे. कॉग्रेस थेट नगराध्यक्ष व मित्रपक्षासह सात जागा मिळवत प्रमुख पक्ष बनला आहे. त्यांच्याकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रांरभी भाजपच्या सात नगरसेवकांसह सत्तेसाठी चर्चा सुरू होती. मात्र देशातील राजकीय परिस्थिती पाहता तशी युक्ती शक्य नसल्याने जिल्ह्यातील नेत्याच्या आदेशानुसार कॉग्रेसकडून राष्ट्रवादी सहा नगरसेवक बरोबर आघाडी करून सत्ता स्थापना होणार असल्याची चर्चा अखेरीला आल्याचे वृत्त आहे. मात्र कॉग्रेसमधील काही नगरसेवक नाराज झाल्याने सत्ता कुणाबरोबर येणार याबाबत गुंता कायम आहे.कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चा नसल्याने काहीही निश्चित नाही.दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या चर्चेच्या प्राथमिक फेऱ्या सुरू आहेत.प्रांरभी भाजप-राष्ट्रवादी, कॉग्रेस-भाजपात चर्चा झाली होती. मात्र सध्यस्थितीत कॉग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणे भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे. भाजपबरोबर युक्ती दोन्ही कॉग्रेसला फरवडणारी नसल्याचा मतप्रवाह असल्याने भाजपबरोबर चर्चा थांबल्याचे चित्र आहे.मात्र ऐनवेळी काहीही अशक्य नाही.या सर्व पाश्वभूमिवर स्विकृत नगरसेवक,उपनगराध्यक्ष, सभापती पदासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्ता स्थापनेचा गुंता सुटत नसल्याने त्यांचीही घालमेल सुरू आहे.प्रमुख नेत्यापेक्षा सत्ता स्थानी जाण्यात नगरसेवकांना अति घाई झाल्याने त्यांच्याकडून चर्चा गतीने सुरू आहे.पदे मिळविण्यासाठी सर्व काही सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चेच्या नंतर आघाडी आकारास येऊ शकते.
दुसरीकडे कॉग्रेसचे नाराज नगरसेवक इकबाल गंवडी यांनी राजीनामा देत दबाव टाकण्यात प्रयत्न केला आहे. मात्र पक्षनेत्याकडे राजीनामा देण्यापेक्षा जिल्हाअधिकारी यांच्याकडे देणे गरजेचे असते. तरचं राजीनामा मंजूर होऊ शकतो. मात्र गंवडी यांनी यांनी राजीनामा देत दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात सत्ता स्थापनेनंतर सर्वकाही ठिकठाक होण्याची शक्यता आहे.
युक्तीसाठी कॉग्रेस कडून प्रस्ताव आला होता.त्यास आंमची संमती आहे. आजही प्रस्ताव स्विकारू,अन्यथा विरोधी बाकावर बसून विरोधी भुमिका बजावु
आ. विलासराव जगताप.
निवडणूकीनंतर सर्व कॉग्रेस नगरसेवकांनी आघाडी किंवा युतीचा निर्णय जिल्ह्यातील नेत्यांच्याकडे सोपविला आहे.आमचे नगरसेवक एकसंघ आहेत.सत्ता स्थापनेचा आज,उद्यापर्यत तोडगा निघेल.
विक्रम सांवत,कॉग्रेस नेते
सध्यस्थितीत भाजपबरोबर युक्ती शक्य नाही.समविचारी कॉग्रेस सोबत आघाडी करावी असे आमच्या नगरसेवकांची मते आहेत.तसा प्रस्ताव कॉग्रेस कडे पाठिला आहे. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला आहे. दोन दिवसात निर्णय होईल.
सुरेश शिंदे, राष्ट्रवादी कॉग्रेस नेते
