नगरपालिका सत्ता स्थापनेचा तिढा कायम कॉग्रेस नेत्यांची माजी मंत्री पंतगराव कदम यांच्याशी चर्चा

0

जत,प्रतिनिधी :जत नगरपरिषदेत कॉग्रेसचा पहिला नगराध्यक्ष बहुजन पार्टीच्या एका सदस्यासह 7 नगरसेवक निवडून आणत कॉग्रेसचा झेंडा फडकविला आहे.तर भाजपचे 7 व राष्ट्रवादी कॉग्रेसचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत.

Rate Card

प्रंचड टोकाचा प्रचाराने रंगलेल्या निवडणुकीत कुणाला बहुमत मिळाले नाही. त्रिशंकू अवस्थेमुळे बहुमत मिळविण्यासाठी कॉग्रेस व भाजपकडून रसीखेच सुरू आहे. नगराध्यक्ष जरी आला असला तरी कॉग्रेसला बहुमत महत्वाचे असल्याने त्यांच्याकडून जोराचे प्रयत्न सुरू आहेत. समविचारी राष्ट्रवादीशी कॉग्रेस नेत्यांनी प्राथमिक बोलणी सुरू केली आहेत. शिवाय जिल्ह्यातील कॉग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्याकडूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या पाश्वभूमिवर कॉग्रेस नेते विक्रम सांवत,तालुकाध्यक्ष आप्पाराय बिराजदार,  नवनिर्वाचित नगरसेवक इकबाल गंवडी,भुपेद्र कांबळे,नामदेव काळे,अशोक बन्नेनावर, श्रीकांत शिंदे,युवराज निकम,इराण्णा निडोणी आदिनीं माजी मंत्री पंतगराव कदम यांची पुणे येथे भेट घेऊन सत्तास्थापने बाबत चर्चा केली. त्यात मंत्री कदम यांनी थोडे थांबा योग्य निर्णय घेऊ असा सल्ला दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे कॉग्रेसच नगरपरिषदेत सत्ता स्थापन्याची शक्यता निर्माण झाली आहे.राष्ट्रवादी बरोबर युक्ती करण्यास काही कॉग्रेस नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे कॉग्रेसकडून भाजपशीही चर्चा सुरू असल्याची चर्चा आहे.युक्तीच्या पाश्वभूमिवर उपनगराध्यक्ष पदासाठी लॉबिग सुरू आहे. सध्यस्थितीत राष्ट्रवादीचे आप्पा पवार,स्वप्निल शिंदे,कॉग्रेसकडून नामदेव काळे,भुपेद्र कांबळे,तर भाजपकडून विजय ताड,श्रीदेवी सगरे यांची नावे चर्चेत आहेत. निवडणूकीसाठीची विशेष सभा 20 डिंसेबरला होण्याची शक्यता असल्याने सत्ता स्थापनेच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. प्रत्यक्षात कोणाची युक्ती कोणाशी होईल व कोन उपनगराध्यक्ष होईल हे निवडीवेळी स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.