अपक्ष उमेदवार निलम व्हनकंडे यांचा झंझावत प्रचार
जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या प्रभाग 2 (ब)च्या अपक्ष उमेदवार निलम तानाजी व्हनकडे यांचा झंझावत प्रचार सुरू आहे.प्रभागातील घरा घरापर्यत पोहचून आपले विकासाचे व्हिजन पटवून देत प्रचार सुरू आहे.प्रभागात सत्तेत असतानाही विकास साधता आला नाही. परिणामी तुंडूब भरलेल्या गटारी,डांसाचे साम्राज्य, खड्डेमुक्त रस्ते,दिवाबत्ती,शुध्द पाणी सारख्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.शहरातील सर्वात मागास प्रभाग राहिला आहे. प्राथमिक सुविधाही येथील नागरिकांना मिळत नाहीत. वाड्या-वस्त्यानां अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे.हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणूक लढवित आहे.प्रभागातील सर्वच प्रश्नाचा अभ्यास केला आहे. प्रभागातील नागरिकाचे सर्व प्रश्न मार्गी कसे लावता येतिल यासाठी आमंच्याकडे विकासाचे व्हिजन अाहे. नागरिकांना अभिप्रेत असलेल्या विकास साधायचा आहे. अशी भूमिका उमेदवार निलमताई व्हनंकडे मतदारांना सांगत आहेत.प्रचार रँली,थेट मतदार भेट,ध्वनिपेक्षेपा वरून प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. प्रभागत यापुर्वी ग्रामपंचायत असताना निलमताई यांच्या सासू ग्रामपंचायत सदस्या होत्या. आम्हाला मोठ्या प्रमाणात पांठिबा मिळत आहे. ऊत्स्फुर्त पणे नागरिक आमच्या प्रचारात सामिल होत आहेत. तुमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आम्हाला मतदारांनी दिला आहे.त्यामुळे आंमचा विजय निश्चित आहे. असे यावेळी युवक नेते तानाजी व्हनकडे यांनी सांगितले.
