गुरूबसव विद्यामंदिरांच्या सुवर्ण महोत्सावास सुरूवात
संख,वार्ताहर : संख येथील गुरूबसव विद्यामंदिर व ज्यूनिअर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित सभारंभाचे उद्धाटन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते झाले.यावेळी मुरघेंद्र महास्वामीजी,चन्नबसव महास्वामीजी, अमृतानंद महास्वामीजी, तुकाराम महाराज गोंधळेवाडी,शिक्षण सभापती तम्मानगोंडा रवी,माजी सभापती आर.के. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रांरभी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. संस्थेच्या पन्नास वर्षापुर्तीच्या स्मरणिकाचे प्रकाशन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात जनपद व जीवन शिक्षण या विषयावर डॉ.सिध्दू रामाण्णा दिवाण यांचे व्याख्यान झाले. रात्री कर्मणूकीचा कार्यक्रम संपन्न झाला.

गुरूबसव विद्यामंदिर सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मरणिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्तो प्रकाशन करण्यात आले.
