“तुम्ही जगा , दुस-याला जगवा” ऊँ नरेंद्रनाथाय नमः

0

   अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम (महाराष्ट्र)यांचा प्रवचन व दर्शन सोहळा दि.06/12/2017 बुधवार रोजी जत हायस्कूल, जतच्या भव्य मैदानावर संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य व आलिशान मंडप उभारण्यात आला असून भाविकांच्या सोयीसाठी बैठक व्यवस्था व गाड्यांच्या पार्किंग ची व्यवस्था चोखपणे बजावण्यात आली आहे. 

     कार्यक्रमाच्या अनुषंगाने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अध्यात्मा बरोबरच त्यांनी सामाजिक कार्यामध्येही खूप मोलाचे व भरीव योगदान दिले आहे.

     महामार्गावरील अपघात ग्रस्तांना तातडीची मदत मिळावी व त्यांच्यावर त्वरीत उपचार व्हावेत यासाठी एकूण 6 महामार्गावर 27 मोठ्या रूग्णवाहिका 24 तास विनामूल्य सेवा बजावण्यासाठी हजर आहेत. सदरच्या सेवेमुळे आज पर्यंत 8700 अपघात ग्रस्तांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे. ही सेवा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या वतीने अविरत सुरू आहे. 

Rate Card

          गरज भासेल तेव्हा रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी ब्लड इन निड या उपक्रमाअंतर्गत गरजू रूग्णांना आवश्यक त्या रक्तगटाचा दाता त्वरीत उपलब्ध करून दिला जातो. या सेवेमुळे आता पर्यंत 3929     रूग्णांना जीवदान मिळाले आहे. 

    जगद्गुरूश्रीं च्या 50 व्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय लष्करातील जवानांसाठी 50,000 रक्तकुपीका संकलन करण्याचा महासंकल्प पार पाडला गेला. ठिकठिकाणी रक्तदान शिबीरे घेऊन हे कार्य मोठ्या उत्साहात पार पडले. त्याचबरोबर या विश्वविक्रमी कार्यात भर टाकणारे आणखी 50,000 रक्तकुपीकांचे संकलन करण्याचा संकल्प करून 65,482 रक्तकुपीकांचे संकलन करून विश्वविक्रम रचून जगद्गुरूश्रींनी दिलेला संदेश “तुम्ही जगा , दुस-याला जगवा” सार्थ करून दाखविला आहे.

    जिवंतपणी नव्हेच तर मरणानंतरही आपण समाजाची सेवा करू शकतो, या कार्याचे दर्शन घडविण्यासाठी जगद्गुरूश्रींनी आवाहन केले तेव्हा त्यांच्या 56,537 अनुयायांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्धार केला असून आज अखेर 11 अनुयायांनी मरणोत्तर देहदान करून मरणानंतरही पुण्यप्रद असे सत्कार्य केले आहे. त्यांच्या अपूर्व त्यागाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजधाम यांचे मार्फत आणखीही बरेच सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यांचे हे कार्य खरोखरीच खूप कौतुकास्पद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.