जतच्या विकासासाठी बहुमताने सत्ता द्या : विक्रम सांवत

0

जत,प्रतिनिधी: जत शहरातील जनतेला गृहीत धरून गेली तीस वर्षे सत्तेत राहूनही जतला मागे ठेवणाऱ्या व विकासकामात आडकाठी घालणाऱ्यांना या निवडणूकीत थारा देऊ नका.त्यांना घरी बसवा. जतच्या विकासासाठी कॉग्रेस कठीबध्द आहे. असे प्रतिपादन कॉग्रेस नेते,जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत यांनी केले.

कॉग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध प्रभागात त्यांनी कोपरा सभा घेतल्या.यावेळी थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुंभागी बन्नेनावर, उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते. 

Rate Card

सांवत पुढे म्हणाले, गत अनेक निवडणूकीत जतकरांनी एकहाती सत्ता दिली. तीन दशके जत शहरात वर्चस्व असूनही जतच्या विकास साधता आला नाही. कामे करणाऱ्या नगरसेवकांना कामे करू दिली नाहीत. विकास कामांना विरोध करण्याची भूमिका यामुुळे मोठ्या अडचणी आल्या. गत निवडणूकीतील त्रिशंकू अवस्थेमुळे विकास साधता आला नाही. भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेसचे मतलबी धोरणामुळे त्यांची सर्वत्र पिछेहाट होत आहे. तालुक्यातील वातावरण कॉग्रेसमय झाले आहे. जतच्या विकासासाठी कॉग्रेस पक्षच सक्षम पर्याय आहे. त्यामुळे जतला बदलण्यासाठी थेट नगराध्यक्ष सह बहुमताने सत्ता द्या जतचा कायापालट करू असा विश्वास सांवत यांनी शेवटी व्यक्त केला. कॉग्रेसकडून पदयात्रा,थेट संपर्क, कोपरा सभा घेऊन आपली भूमिका मतदारा पर्यत पोहचविण्यात येत आहे.चित्ररथाद्वारे जनजागृत्ती करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.