गुरूबसव विद्यामंदिरांचे काम कौतुकास्पद ; संग्रामसिंह देशमुख

0

संख,वार्ताहर : संख येथील श्री. गुरूबसव विद्यामंदिर सुवर्ण महोत्सवानिमित्त दुसऱ्या विविध कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी कर्नाटकच्या कन्नड सांस्कृतिक मंत्री श्रीमती उमाश्री, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी सभापती आर. के. पाटील, आरोग्य सभापती तम्मानगोंडा रवी, अमृत्तानंद स्वामीजी,तुकाराम महाराज,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, रेखा बागेळी,स्नेहलता जाधव, कविता खोत, रविंद्र हत्तळी,आप्पासाहेब नामद,संरपच मंगल पाटील,ज्योती पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.सिमावर्ती भागात अनुकूल परिस्थिती नसताना भव्य शैक्षणिक संकुल उभारून परिसरात शिक्षण क्रांती घटविण्याचे काम गुरूबसव विद्यामंदिरांतून घडले आहे. परिसरातील परिस्थिती पाहता शिक्षण संस्थेने केलेली प्रगती वाखण्याजोगी आहे. दुर्लक्षीत भागातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम सदैव्य या संस्थेतून घडत राहो असे प्रतिपादन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख केले.

संस्थेच्या पन्नास वर्षापुर्तीच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शुक्रवार,शनिवार,रविवार विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी विविध कार्यक्रम संपन्न झाले. शाळेच्या नुतन इमारतीचे उद्धाटन मंत्री श्रीमती उमाश्री याच्यां हस्ते झाले. 

रवि बजंत्री यांचे व्याख्यान झाले. झी टिव्ही कन्नड सारेगमप चॅम्पियन सुनिल,चंदन,सुहाना,मैत्रेयी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. विविध पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सांगता सभारंभ होणार आहे.

Rate Card

फोटो

संख येथील श्री. गुरूबसव विद्यामंदिर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित सभारंभात उपस्थित कर्नाटकच्या कन्नड सांस्कृतिक मंत्री श्रीमती उमाश्री, जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, तम्मानगोंडा रवी, आर.के. पाटील. यावेळी संस्थेच्या नुतन इमारतीचे उद्धाटन मंत्री श्रीमती उमाश्री याच्या करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.