माझी भुमिका थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी जत शहर स्मार्ट शहर बनविणार

0

जत,प्रतिनिधी : जत शहरात नवनिर्माण करत विकासकामातून स्मार्ट शहर बनवू,देश व केंद्र शासनाच्या माध्यमातून भाजपची सत्ता नगरपरिषदेवर असल्यास शहराचा विकास झपाट्याने करणे शक्य आहे. अशी भूमिका भाजपच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांनी व्यक्त केली.

जत नगरपरिषदेच्या त्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. शहरातील प्रचार यंत्रणा राबविताना जत किती मागे आहे यांची अनुभूती होते. दीर्घकाळ सत्तेत असताना सत्ताधारी मंडळीना जतचा विकास साधता आला नाही. परिणामी भकास जत बघण्याचे भाग्य शहरातील जनतेच्या नशिबी आले आहे. नगरपरिषद होऊन पाच वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र जतचा कारभार ग्रामपंचायती सारखा झाला. निधीची कोट्यावधीची कामे झाली मात्र; प्रत्यक्षात त्याचां लाभ जनतेपेक्षा सत्ताधारी मंडळीना झाल्याचे भासत आहे. शहरातील रस्त्यावरील खड्डे,गटारी,अस्वच्छ नाले, भाजी मार्केट, दिवाबत्ती, स्वच्छालयाची प्राथमिक समस्या सोडविण्यातही सत्ताधारी मंडळीनी कमी पडले आहेत. सर्वच पातळीवर जतला मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. संयमी जतकरांच्या भावनेशी खेळण्याचा काहीसा प्रकार भष्ट्राचार मुद्दा पुढे येताना स्पष्ट आहे. नेमके जनतेला कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागते यांचीच दखल घेतली नाही. त्यामुळे अस्वच्छ, भष्ट्र कारभाराची चर्चा होत आहे. हेच चित्र बदलण्यासाठी मी डॉ. रविंद्र आरळी यांच्या समाजहिताच्या कार्याचा वारसा घेऊन जत नगरपरिषदेच्या पहिल्या थेट नगराध्यक्ष निवडणूकींत उतरले आहे. प्रत्यक्षात राजकारण किंबहुना सत्ता किंवा अर्थकारण ह्या गोष्टी आम्हाला महत्वपुर्ण नाहीत.जतच्या जनतेला अभिप्रेत असेलेला विकास साधायचा आहे. प्रत्यक्षात आम्ही वैद्यकीय व्यवसाय करत असताना काही गोष्टी खटकायच्या मात्र त्यावर आमची मते मांडता आली नाहीत. जतच्या विकासासाठी मी निवडणूक लढवित आहे. देश,राज्य,जिल्हा,तालुका पातळीवर विकासाचे धोरण असलेल्या भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जतचा सर्वागिंन विकास खुंटला आहे. त्यात गती आणण्यासाठी भाजपप्रणित माझ्यासह सर्व नगरसेवकांना बहुमताने विजयी करा. शहरातील जनतेनी सर्व समस्याचे निराकारण करून शहराला जिल्ह्यात आदर्श बनवू.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.