अपक्ष उमेदवार निलम व्हनकंडे यांचा विजय निश्चित

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या प्रभाग 2 (ब)च्या अपक्ष उमेदवार निलम तानाजी व्हनकडे यांना मतदाराचां मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे त्यांच्या विजय निश्चित असल्याचा दावा युवक नेते तानाजी व्हनकडे यांनी व्यक्त केला.

त्यांनी प्रभागातील विविध भागात थेट संपर्क करत प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रभागातील सर्वागिंन विकासाठी आम्हची उमेदवारी आहे. गत पाच वर्षात प्रभागातील प्राथमिक समस्या सुटलेल्या नाहीत. पाणी,रस्ते,दिवाबत्ती,गटारीसारखे जिव्हाळ्याचे प्रश्न तसेच आहेत. या समस्याचे निवारण करणे,प्रशासनात याबद्दल आवाज उठवून विकास योजना खेचून आणणाऱ्या सक्षम उमेदवारांची गरज असते. त्या भूमिका आमंच्या उमेदवार पात्र आहे. उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचा आमचा उमेदवार नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम तत्पर असेल.ग्रामपंचायती पासून राजकारणाचे बाळकांडू घरातून मिळालेले आमंच्या उमेदवार प्रभागात विकासासाठी प्रयत्नशील राहतील. सातारा-विजापुर महामार्ग,सांवत,शिर्के गल्ली,तंगडी मळा,अमृत्तवाडी रोड येथ पर्यत विस्तारलेल्या प्रभागात आम्हाला मोठा पांठिबा मिळत आहे. त्यामुळे आमच्या विजय निश्चित आहे. असेही शेवटी व्हनकंडे यांनी सांगितले. नुकताच प्रचाराचा नारळ फोडून व्हनकडे यांनी प्रचाराच्या फेरी पुर्ण केल्या आहेत. प्रभागाचा विकास हाच अंजेटा घेऊन त्या प्रचार यंत्रणा राबवित आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.