बंडखोरी रोकण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या अर्ज माघारीचा मंगळवारी अंतिम दिवस आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी बंडखोरी केली आहे. सर्व पक्षात कमी जास्त प्रमाणात बंड पुकारले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून बंडखोरी केलेल्याची मनधरणी वरिष्ठ नेत्याकडून सुरू आहे. त्यात काही प्रमाणात यश आल्याचे चित्र आहे. मात्र काहीजण आम्ही तयारी केली आहे. मतदारांचा आम्हाला मोठा पांठिबा आहे. त्यामुळे निवडणूक लढविणारचं म्हणून आडून बसले आहेत. बंडखोरी कोणत्याही पक्षांना परवडणारी नाही. त्यामुळे बंड शमविण्याचा शेवटच्या क्षणा पर्यत होणार आहे. अनेकांना वेगवेगळी आमिषे दाखविण्यात येत आहेत. प्रत्यक्षात अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी 5,व नगरसेवक पदासाठी 129 अर्ज छानणीत पात्र ठरले आहेत.
