आता बंडोबाना शांत करण्याचे आवाहन नगराध्यक्ष 5,नगरसेवक 91 अर्ज वैद्य ; 28 नोव्हेंबर माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका निवडणूकीच्या उमेदवार अर्ज छानणीत नगराध्यक्ष पदासाठी 5 व नगरसेवक पदासाठी 91 उमेदवारांचा अर्ज पात्र झाले आहेत.माजी जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी अक्की यांचा नगराध्यक्ष पदासाठी कॉग्रेस मधून भरलेला पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने महत्वपुर्ण अर्ज अपात्र ठरला.

निर्णायक टप्प्यावर आलेली नगरपालिका निवडणूकीची गुरूवारी अर्ज छानणी झाली. त्यात नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवक पदासाठी 129 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

Rate Card

भाजप,कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस अशी तिंरगी सामना रंगणार आहे. त्याशिवाय पक्षाचे उमेदवारी न मिळाल्याने अनेक नाराज इच्छूंकांनी अर्ज भरले आहेत.राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपकडून काहीची बंडखोरी निश्चित आहे.  ता.28 ला होणाऱ्या अर्ज माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे. कॉग्रेसकडून सर्वाधिक बंड करत अपक्ष अर्ज सर्वाधिक भरले आहेत. त्यामुळे बंड पुकारलेल्याचे बंडोबाना शांत करण्याची कसरत सर्वच पक्षातील नेत्यांना करावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.