भाजपच्या प्रचाराचा आज शुभारंभ सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांची उपस्थिती : सांयकाळी सहा वाजता प्रचार सभेचे आयोजन

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीच्या स्टार प्रचाराच्या सभेचा धुरळा आजपासून सुरू होत आहे. भाजप उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांच्या प्रचारार्थ आज पालकमंत्री सुभाष देशमुख यांची सभा होत आहे. शहरातील गांधी चौकातील मारूती मंदिराजवळ सांयकाळी 6 वाजता भाजप उमेदवाराच्या प्रचारा शुभारंभ होणार आहे. तेथेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Rate Card

जत नगरपालिकेवर सत्ता मिळवायचीच म्हणून भाजप नेत्यांनी चंग बांधला आहे. यापूर्वी कधी घडले नव्हते,असे यंदा घडू शकते अशी स्थिती निर्माण झाल्याने भाजप नेते आ. विलासराव जगताप, डॉ. रविंद्र आरळी यांचा विश्वास दुणावला आहे. जत शहरावर एकतर्पी सत्ता मिळविण्यासाठी आ. जगताप यांना यापुर्वी कधी जमले नव्हते. मात्र भाजप मधून आमदार झालेले आ. जगताप यांनी यावर्षी जत नगरपालिकेत भाजपचे निशान फडविण्याचे नियोजन केले आहे. प्राथमिक टप्यात त्यात यश आले आहे. तालुक्यातील परिचित वैद्यकीय व्यवसायिक भाजपचे जेष्ठ नेते डॉ. रविंद्र आरळी यांच्या पत्नी यावेळी भाजपमधून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. तीन दशकाहून जास्त काळ जत शहराच्या वैद्यकीय व्यवसाय करत जनतेसी नाळ जोडलेले डॉ. आरळी यांच्या उमेदवारींने निम्मी लढाई भाजपने जिंकली आहे. बाकी उमेदवारांचे सक्षम पँनेल उभे करण्यात यश आले आहे. त्यामुळे जत नगरपालिकेच्या निवडणूकीत भाजप इतिहास घडविणार आहे. त्याचांच भाग म्हणून अर्ज माघार घेण्याअगोदर पालकमंत्री सुभाष देशमुख यांची आज जत शहरात जाहीर सभा होत आहे. एंकदरीत भाजप नेत्यांनी पत्ते ओपन करण्यास सुरूवात केली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.