जतचा विकास खड्ड्यात ; मतदारांच्या मणक्याला दणका शहरातून रस्ते गायब, धुळीने गुदमरतो जीव, आरोग्यही धोक्यात

0

जत , विशेष प्रतिनिधी;

जत शहरात ’मागील पाच वर्षांत विकास होवो न होवो ’मात्र खड्ड्यांचा विकास मात्र भरपूर झाला आहे. आता रस्त्यात खड्डे आहेत की,खड्ड्यात रस्ता हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे शहरात कधीतरी चांगले रस्ते होतील भाबड्या आशेवर असलेल्या मतदारांच्या मात्र थेट मणक्याला दणका बसाला लागला आहे. नाका तोंडात धुरळा जाऊन जीव गुदमराला लागला आहे. पाच वर्षांत जे रस्ते केले त्यावरही खड्डे आणि जे रस्ते केले नाहीत, त्यावर तर खड्डेच खड्डे अशी दुर्दशा झाली आहे. खड्डे आणि त्याधून उडणाऱ्या धुरळ्याने ’मतदार राजाचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कायम दुष्काळी असलेल जत तालुक्याला वाळव्याचे वाघ, शिराळ्याचे नाग व जतची मेंढरं’ असे म्हणून नेहमीच अपमानीत केले जाते. बाहेरच नेत्यांकडून जतच जनतेचा अपमान तर होतोच. मात्र तालुक्यातील नेत्यांनी त्याहूनही घोर कुचेष्टा चालविली आहे, असे सध्याच्या जत शहराच्या बकाल अवस्थेवरून दिसत आहे. जत तालुक्याची आण, बाण अन् शान असलेल्या जत शहराची बकाल नगरी करण्याचे पाप कोणाचे? असा सवाल आता मतदारांतून विचारला जाऊ लागला आहे.

जत नगर पालिकेच दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजले. रणधुमाळी सुरू झाली. सत्तेच सारीपाटावर आपले मोहरे पुढे करणसाठी प्रत्येकजण सरसावला आहे. ‘कोण बनेेगा जत नगर पालिकेचा पती’ असा सूसाट खेळ सुरू झाला आहे. ’मात्र या सर्वांमधील महत्वाची कडी असलेल्या मतदारांचे काय? शहरात वर्षांनुवर्षे अनेक समस्यांचा सामना करित जगणाऱ्या सामन्य जनतेचे का?

४५ हजार लोकसंख्या असलेल्या जतकरांना दररोजचे ताजे पाणी मिळू शकत नाही. चार ते पाच दिवसांनी एकदाच पाणी मिळते, तेही अशुध्द. गल्लीबोळात गटार नाही, की साधा रस्ता नाही. साचलेल्या सांडपाण्यावर डासांचे थैमान वाढत आहे. मलेरिया डेंग्यू व चिकनगुणीयाने शेकडो लोक हैराण झाले आहेत. वाहतुकीची समस्या, अतिक्रमणाचा विळखा, विकासाचा सत्यानाश, असे अतिशय भकास चित्र शहरात पहावास मिळत आहे.सर्वात भीषण प्रश्‍न आहे तो शहरातील रस्त्यांचा. सार्वजनिक बांधकाम’ विभागाबरोबरच नगर पालिकेच्या आशीर्वादाने जत शहरात खड्डा नसलेला एकही रस्ता सध्या अस्तीत्वात नाही. काही भागात तर याठिकाणी एकेकाळी डांबरी रस्ता होता, असे सांगण्याची वेळ आली आहे. मध्यवर्ती बाजारातील भाजी मार्केट, गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक, मार्केट यार्ड ते सोलनकर चौक, चिनगी बाबा ते वाचनाल चौक या महत्वाच्या ठिकाणी रस्ता औषधालाही राहिला नाही.

शहरातील रस्त्यावर एका फुटावर खड्डा अशी अवस्था आहे. केवळ छोटा खड्डा नसून दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधील अडथळ्यांची शर्यत पार करताना जतकरांचा जीव मेटाकुटीस आला आहे. अनेक जेष्ठ नागरिक, मणका, कंबर व सांधेदुखीचा त्रास असणारांची दुखणी वाढली आहेत. मणक्यामधील गॅप वाढण्याची समस्या उद्भवू लागली आहे. जनता दवाखानचे उंबरठे झिजवत आहे. काहीजणांना मोटारसाकल न चालविणचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे जतमधील रस्त्यांवरून तर अजिबात चालवू नका,असे ठणकावून सांगितले आहे.


Rate Card

धुळीचे लोट, प्रदूषणात वाढ


शहरातील महत्वाच रस्त्यांवरील डांबर गाबय झाले आहे. खड्डे, मातीं’धून वाहनांची वर्दळ वाढल्याने धुळीचे लोट उसळाला लागले आहेत. त्यामुळे प्रदूषाणाची पातळी वाढली आहे. श्‍वसनाचे विकार असलेलंना या धूळीचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे. लहान बालके, शाळकरी मुले, जेष्ठ नागरिक यांना या धूळीचा त्रास होत आहे. रस्त्यावरील धूळीचा सर्वाधिक त्रास व्यापारी, दुकानदार, विक्रेते यांना होत आहे. दुकानात धुळीचे थर साचत आहेत. नवीन वस्तू, इले्नट्रॉनिक उपकरणे खराब होत असल्याचही तक्रारी आहेत.


ठेकेदार,नेते मालामाल 


शहरात किती रस्ते झाले हे कोणीही छातीठोकपणे सांगत नाही. मात्र जी कामे झाली तीही अत्यंत सुमार दर्जाची आहेत.त्यामुळे नव्याने केलेले रस्तेही आता अदृष्य झाले आहेत. नेते व ठेकेदार यामधून गब्बर झाले आहेत. निकृष्ठ दर्जाच्या कामांना पाठिशी घालण्याचा उद्योग सातत्याने सुरू आहे. रस्त्यावर मुरूम टाकण्याची बिले काढून अनेकजण गब्बरही झाले आहेत. मात्र जनता बेहाल झाली आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे मणक्याला बसणारे दणके सहन करित असंतोष प्रकट करू लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.