भाजप उमेदवार डॉ. रेणुका आरळीची प्रचारा अगोदर आघाडी आ. विलासराव जगताप नगरपालिकेवर भाजपचा पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष बसविण्याचा इतिहास करणार.?

0

 

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका निवडणूकीच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. आज शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष साठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत.त्यात प्रमुख पक्षाचे तिन  व अन्य अर्जाचा समावेश आहे.तालुक्यातील महत्वपुर्ण असणाऱ्या पालिकेत सत्ता मिळवायची म्हणून आमदार विलासराव जगताप व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी जंग पछाडले आहे. तालुक्यातील महत्वाचे सत्ता केंद्र ताब्यात ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. यात भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवार शबाना इनामदार यांच्या तुल्यबंळ लढत निश्चित आहे. कॉग्रेसकडून शुंभागी बन्नेनावर मैदानात आहेत. भाजपचे जेष्ठ नेते डॉ. रविंद्र आरळी यांच्या पत्नी असलेल्या डॉ. रेणुका आरळी यांच्या उमेदवारी जाहीर झाल्यापासून जनतेतून झंझावत प्रचार सुरू झाला आहे. त्यांच्या उमेदवारीला शहरात मोठा पांठिबा मिळत आहे. शहरातील वैद्यकीय क्षेत्रात तीन तपाहून जास्त काळ काम करत असलले डॉ. आरळी यांना माननारा मोठा वर्ग जत शहरात आहे. तो डॉ.रेणुका आरळी यांच्या विजयासाठी सक्रीय झाला आहे. उमेदवारी घोषित होताच. डॉ. रेणुका आरळी यांचे नाव गल्ली,मोहला,वाड्या-वस्त्यावर चर्चेले जात आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. प्रचाराअगोदर त्यांनी आघाडी घेतल्याचे शहरातील चित्र आहे. त्यामुळे आमदार विलासराव जगताप यांच्या जत नगरपालिका भाजपचा पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष बसविण्याच्या प्रयत्नाला पहिल्या टप्यात तरी यश येताना दिसत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.